बीड । वार्ताहर
कोरोना संकटात जिल्ह रुग्णालयात कोविड वार्ड तयार करण्यात आल्याने जिल्हा रुग्णालय येथील आदित्य वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीमध्ये हलविण्यात आले होते. जिल्हा रुग्णालयाच्या परिसरात असलेल्या शासकीय नर्सिंग महाविद्यालयाच्या वसतीगृहातील विद्यार्थिनींनाही आदित्य महाविद्यालयाच्या वसतीगृहात राहण्यासाठी आदित्य संस्थेच्या संचालीका आदिती सारडा यांनी परवानगी देवून कोरोना संकटात मोठा आधार दिला त्यामुळे दोन दिवसापूर्वी हे वसतीगृह पुन्हा जिल्हा रुग्णालयात स्थलांतरीत करण्यात आले तेंंव्हा वसतीगृहाच्या अधिक्षक आणि नर्सिंगचे शिक्षण घेणार विद्यार्थींनीनी आदिती सारडा यांचे आभार मानले.
कोरोना संकटात जिल्हा रुग्णालयाच्या प्रशासनासमोर नर्सिंगचे शिक्षण घेणार्या विद्यार्थिनींना कोठे स्थलांतरीत करावे असा प्रश्न होता. जिल्हा रुग्णालय स्थलांतरीत झाल्यानंतर तत्कालीन शल्यचिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी नर्सिंगच्या विद्यार्थींनींची अडचण संस्थेच्या संचालक आदिती सारडा यांच्यासमोर मांडली त्यांनी कसलाही आर्थिक मोबदला न घेतला मुलीचे वसतीगृह व परिक्षा इमारतीमधील महाविद्यालयात शिक्षण घेणर्या विद्यार्थींनीचे साहित्य इतरत्र हलवून नर्सिंगच्या विद्यार्थींनीना जागा उपलब्ध करुन दिली आणि पालकत्वाची जबाबदारी निभावली कोरोनाचा संसर्ग आणि रुग्ण कमी झाल्याने जिल्हा रुग्णालयातील काही भाग कोविड वार्ड म्हणून ठेवण्यात आला आहे.
तर उर्वरित रुग्णालयाच्या जागेमध्ये रुग्णालयाचे विविध विभाग सुरु करण्यात आले आहेत. त्यामुळे नर्सिंगचे प्रशिक्षण घेणार्या विद्यार्थींनीचे वसतीगृहही चालू करण्यात आले आहे. ज्यावेळी विद्यार्थींनी आदित्य संस्थेच्या वसतीगृहातून आपले साहित्य पुन्हा आपल्या जुन्या वसतीगृहामध्ये नेतांना आदिती सारडा यांना भेटून त्यांचे आभार मानले नर्सिंग महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य डॉ.बेदरे आणि विद्यार्थींनीनी आदिती सारडा यांना पुष्पगुच्छ देत त्यांचे ऋण व्यक्त केले. यावेळी आदित्य दंत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.भालेराव, डॉ.अरुण मुंडे, डॉ.पालवे, प्राचार्य शाम भुतडा, प्राचार्य कचरे, नागरगोजे यांचेही आभार मानले.
Leave a comment