जिल्हाधिकारी रेखावारांच्या शिस्तीला कर्मचार्यांकडून हरताळ
बीड । वार्ताहर
अवघ्या राज्यात बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावारांच नाव झाले. कोरोना संकटात कुठलाही संयम न ढळू देता अत्यंत चिकाटीने प्रशासनाकडून काम करुन घेत जिल्हावासियांचे संरक्षण करण्यात त्यांना यश मिळाले. त्यांच्या कार्यपध्दतीचे आजही कौतूक होते. अशा राहुल रेखावार यांच्या कार्यालयातच कोव्हीड 19 अंतर्गत सर्वच नियमांना कर्मचार्यांकडून हरताळ फासला जात आहे. जिल्हाधिकारी रेखावार यांनी कुठे-कुठे लक्ष द्यावे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
बीड जिल्हाधिकारी कार्यालयात रेखावार यांचा कक्ष-कार्यालय सोडले तर बाकी इतर ठिकाणी कुठेही सॅनिटायझेशन नाही. मास्क वापरल्याचे दिसले नाही. दररोज केवळ जिल्ह्यातूनतच नव्हे तर इतर शहरातूनही नागरिक कुठल्या न कुठल्या कामासाठी या कार्यालयात येतात, मात्र त्यांच्यावर कुठलेही बंधन घालण्यात येत नाही. रजिष्ट्रीय कार्यालय, उपविभागीय कार्यालय, एनआयसी आदी ठिकाणी मुद्दामहून पाहणी केली असता कोरोना होता की नाही अशीच परिस्थिती दिसून आली. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्हाधिकारी रेखावार यांनी केलेले प्रयत्न अमूल्य आहेत. त्यांची आठवण तरी या अधिकारी, कर्मचार्यांनी ठेवायला हवी. अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
एसपी ऑफीसमध्येही अलबेल!
जिल्हाधिकारी कार्यालयाप्रमाणे एसपी ऑफीसमध्येही सारे काही अलबेल असल्याचे चित्र दिसले. एसपी. राजा स्वामी नेमके काय सुरु आहे? कायदा व सुव्यवस्था, अवैध धंदे, गुन्हेगारी याकडे त्यांनी आल्यापासूनच फारसे लक्ष दिले नाही. अधिकार्यांच्या बैठकीत केवळ सांगीतले जाते, मात्र अंमलबजावणी कोठेही नाही. एसपी ऑफीसमध्ये, परिसरात कोरोना कुठे होता की नाही असेच चित्र दिसून आले.
Leave a comment