गुरूवारपासुन नियोजन; समुह पर्यटन,दर्शनाची संधी
बीड । वार्ताहर
बीड येथील राज्यपरिवहन महामंडळाच्या विविध मार्गावर दि.7 जानेवारी पासुन पॅकेज टुर्स्चे आयोजन करण्यात आले आहे. 40 प्रवाशांचा समुह पर्यटन, दर्शन करीता उपलब्ध झाल्यास त्यांच्यासाठी स्वंतत्र बस सोडण्यात येणार असल्याची माहिती विभाग नियंत्रक भगवान जगनोर यांनी दिली आहे.
बीड विभागातील बीड आगाराकडुन महिन्याच्या प्रत्येक शनिवारी अष्टविनायक दर्शन, वेरूळ, घृष्णेश्वर दर्शन, महिन्याच्या प्रत्येक रविवारी विशेष दर्शन बससेवा सुरू करण्यात येत आहे. सदर बसेस आरक्षणासाठी उपलब्ध आहेत. बीड-खुलताबाद-वेरूळ-घृष्णेश्वर दर्शन यासाठी प्रति प्रवासी 450 रू. तर हाफ टिकीट म्हणुन 225 रू. दर असणार आहे. बीड ते अष्टविनायक दर्शनासाठी प्रति व्यक्ती 1210 तर हाफ टिकीट 605 रू.प्रमाणे तिकीट दर असणार आहे. अंबाजोगाई येथील अक्कलकोट दर्शनासाठी( वेळ सकाळी 8 ते रात्री 8 ) प्रति प्रवासी 580 रू. तर हाफ तिकीट 290 रू. याप्रमाणे तिकीट दर असणार आहे. प्रवाशांनी बीड आगाराशी (निलेश पवार, आगार व्यवस्थापक 8275926011) या क्रमांकाशी संपर्क साधावा आणि पॅकेज टुर्स्चा लाभ घ्यावा असे आवाहन जगनोर यांनी केले आहे
Leave a comment