अंबाजोगाई । वार्ताहर
पत्रकार संघ अंबाजोगाई यांच्या वतीने दिल्या जाणा-या कै.भिकाभाऊ राखे स्मृती पत्रकारिता पुरस्कारासाठी ज्येष्ठ पत्रकार अशोकराव देशमुख (बीड) तर कै.धनंजय गद्रे स्मृती पत्रकारिता पुरस्कारासाठी पत्रकार प्रतापराव नलावडे (बीड) यांची निवड करण्यात आली आहे.दोन्ही मान्यवर पत्रकारांचा बुधवार,दि.6 जानेवारी 2021 रोजी अंबाजोगाईत विशेष सन्मान करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार अमर हबीब हे असतील तर प्रमुख अतिथी म्हणून आमदार सौ.नमिता अक्षय मुंदडा,आमदार संजय दौंड,बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजकिशोर मोदी, अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन रमेशराव आडसकर,माजी आमदार पृथ्वीराज साठे,उपनगराध्यक्ष बबनराव लोमटे, स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.शिवाजीराव सुक्रे या मान्यवरांच्या हस्ते व उपस्थितीत पुरस्कारांचे वितरण होणार आहे.
Leave a comment