नववर्ष ठरणार कोरोनामुक्तीचे; आज केवळ 17 रुग्ण
बीड | वार्ताहर
तब्बल 250 हून अधिक रुग्ण एका दिवसात सापडणार्या बीड जिल्ह्यात नवीन वर्षाच्या प्रारंभी केवळ 17 रुग्ण निष्पन्न झाले आहेत. गत वर्षात मार्चपासून निष्पन्न झालेल्या रुग्णांच्या तुलनेत आज शुक्रवारी निष्पन्न झालेल्या रुग्णांचा हा आकडा सर्वात कमी ठरला आहे. यामुळे आता जिल्ह्याची खर्या अर्थाने कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरु झाल्याचा विश्वास निर्माण होत आहे. असे असले तरी नागरिकांनी आणखी काही दिवस कोरोनाच्या नियमांचे पालन करणे अत्यावश्यक असल्याचे आवाहन आरोग्य प्रशासनाने केले आहे.
शुक्रवारी (दि.1) जिल्ह्यात 467 संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली. यातील तब्बल 450 जणांचे अहवाल कोरोना निगेटिव्ह आले आहेत तर केवळ 17 नवे रुग्ण निष्पन्न झाले आहेत. बाधितांमध्ये अंबाजोगाई तालुक्यात 2, आष्टी, माजलगाव, केज व पाटोदा या चार तालुक्यात प्रत्येकी 1 तर बीड तालुक्यात 6, गेवराईत 3 व परळी तालुक्यात 2 रुग्ण निष्पन्न झाले आहेत. आजा जिल्ह्यातील एकुण कोरोना बाधितांची संख्या 16 हजार 800 इतकी झाली असून यापैकी 15 हजार 968 जणांनी कोरोनावर मात केली असून 531 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी ही माहिती दिली.
Leave a comment