महात्मा फुलेंच्या नावाने बांधलेला वास्तूचा सत्यानाश
बीड । वार्ताहर
बीडचा चेहरा मोहरा बदलणार, बदलत बीड अशा घोषणा देत बीडच्या भाजी विक्रेत्यांना घाणींचा, दुर्गधीचा सामना करण्याची वेळ येवू नये, शहराचा नावलौकीक वाढावा, बीडमध्ये वातानुकुलित भाजी मंडई आहे असे बीडकरांनी छातीवर करून सांगावे यासाठी कोट्यवधी खर्च करून महात्मा फुलेंच्या नावाने उभारण्यात आलेला वातानुकूलीत भाजी मंडईचे रूपांतर नगर परिषद व नगराध्यक्ष डॉ.भारतभुषण क्षीरसागर यांच्या दुर्लक्षामुळे सार्वजनिक मुतारीमध्ये रूपांतर झाले आहे. या ठिकाणी भाजी विक्रेते तर आलेच नाही पण मुतारी अड्डे मात्र सुरू झाले आहेत.
गेल्या तीस-पस्तीस वर्षापासून बीड न.प.मध्ये डॉ.भारतभुषण क्षीरसागरांचे अधिराज्य आहे. शहरात आज जी काही विकासकामे झाली आहेत ती त्यांच्याच प्रयत्नातून झाली आहेत. विद्यमान परिस्थितीमध्ये शहरात विविध भागात रस्त्यांची मोठ्या प्रमाणात कामे सुरू आहे. शहरात केवळ रस्ते, नाल्या झाल्या म्हणजे विकास झाला असे होत नाही त्यामुळे ओपन जिम, क्रीडागंण, नाट्यगृह, स्वच्छता गृह याकडे देखिल लक्ष दिले जाते, नगराध्यक्ष क्षीरसागर यांच्या दूरदुष्टीतूनच मराठवाड्यात कोठे नाही अशी वातानुकुलित (एअर कंडीशनर) भाजी मंडई बीडला उभारण्याचे काम झाले.
परिसरात क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले आणि सावित्रीबाई फूलेंचा पुतळा असल्याने या भाजी मंडईला महात्मा फुलेंचे नाव देण्याचा ही निर्णय झालेला आहे. भाजी मंडई उभारली गेली, पुर्णही झाली मात्र बागवान मंडळीचा विरोध, भाजी विक्रेत्यांनी त्यावेळी दिलेला नकार यामुळे उभा केलेला वास्तू तशी आहे. अलीकडे या चांगला भव्य वास्तूचा वापर लोकांनी चक्क मूतारीसाठी सुरू केला आहे. रात्री दारूच्या पार्ट्याही होतात. काही मोक्कार वृत्तीचे युवक रात्री दारूच्या बाटल्या घेवून बसत आहे. याचा अनेक वेळा व्यापार्यांना, रहिवाशांना त्रासही होतो. भाजी मंडई येणार नसेल तर निदान नव्याने दुकाने काढुन ती व्यवसायिकांना तरी द्यावीत म्हणजे जागेचा दुरूपयोग तरी होईल.
गेल्या दहा वर्षापासून ही इमारत तशीच उभी आहे. नगर परिषदेने बांधून मोठ्या प्रमाणात शेड काढले त्याचे पैसेही अडकून पडले आहेत. या ठिकाणी भाजी मंडई सुरू करायची नसेल तर इतर व्यवसायिकांना भाडे तत्वावर द्यावेत म्हणजेच जागेचा उपयोग तरी होईल अशी मागणी ही जनतेमधून होत आहे.
सिध्दीविनायक संकूल गुन्हेगारी-जूगारांचा अड्डा!
नगरपालिकेने बांधलेल्या सिध्दीविनायक संकूलच्या आतील बाजूस रिकामे मैदान आहे. लहान लहान चहाची दुकाने, पान टपर्या मोठ्या प्रमाणात आहेत. शहरातील विविध भागातील युवक, गुन्हेगार रात्री येथे येवून टाईमपास करतात हा परिसर गुन्हेगांराबरोबर जुगारांचा ही अड्डा झाला आहे. नगर परिषद, पोलिस प्रशासनाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. एखादी दुर्घघटना घडल्यानंतर न.प चे डोळे उघडतील असेही बोलले जात आहे.
Leave a comment