आष्टी । वार्ताहर
तालुक्यातील सुरडी गावचे पंचायत समिती सदस्य पती नागनाथ गर्जे यांचा बिबट्याने केलेल्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला होता.खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी सुरडी येथे भेट देऊन गर्जे कुटुंबियांचे सांत्वन केले.या अकस्मात संकटाने गर्जे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.या दुःखद प्रसंगात आम्ही गर्जे कुटुंबाच्या सोबत आहोत,भविष्यातही कायम आपल्या पाठीशी उभे राहू अशा शब्दात त्यांनी नागनाथ गर्जे यांच्या कुटुंबांना मायेचा आधार दिला.तसेच वन विभागाच्या अधिकार्यांकडून त्यांनी आढावा देखील घेतला.
मागील काही दिवसांपासून नगर,बीड जिल्ह्याच्या सीमा भागात बिबट्याकडून होणार्या हल्ल्यांमध्ये वाढ झाली होती.आष्टी तालुक्यातील सुरडी गावचे नागनाथ गर्जे यांचा बिबट्याच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला.त्यांच्या दुर्दैवी मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले.तसेच गर्जे कुटुंबियांवर कोसळलेल्या दुःखात सहभागी होऊन नागनाथ गर्जे यांच्या मृत्यूवर शोक व्यक्त केला.याप्रसंगी त्यांनी वन विभागाच्या अधिकार्यांशी चर्चा करून हल्ले रोखण्यासाठी करण्यात येणार्या उपाययोजनांचा आढावा घेतला.यावेळी वन विभागाच्या अधिकार्यांनी सांगितल्याप्रमाणे नगर-बीड जिल्ह्याच्या सीमा भागातील बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू असून औरंगाबाद आणि अमरावती येथील वन विभागाच्या दोन एक्सपर्ट टीम याकामी कार्यरत आहेत.तसेच बिबट्याला जेरबंद करण्यासाठी परिसरात ट्रॅकिंग देखील करण्यात येत आहे.याप्रसंगी खा.प्रितमताई मुंडे यांनी बिबट्याचा वावर असलेल्या परिसरातील नागरीकांनी दक्षता घेण्याचे आवाहन केले.
Leave a comment