बीड । वार्ताहर
लॉकडाऊन काळापासून राज्यभरात वीज ग्राहकांना महावितरण कंपनीकडून वाढीव वीज बिले आकारण्यात आली आहेत. याचा निषेध करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ही बिले तात्काळ कमी करावीत व राज्यभरातील जनतेला दिलासा द्यावा. अनेक वीज ग्राहकांना वाढीव वीज बिलाचा नाहक खर्च सहन करावा लागत आहे. याकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज गुरुवारी (दि.26) एकाच दिवशी राज्यभरात महामोर्चाचे आयोजन केले आहे. बीड शहरातही प्रमुख मार्गावरुन निघालेला हा मोर्चा दुपारी दीड वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी मनसे पदाधिकार्यांसह जिल्हाभरातील मनसैनिक, शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मोर्चा दरम्यान शहरात ठिकठिकाणी आज सकाळपासूनच मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
मनसेने आज वाढीव वीज बिलाच्या विरोधात जिल्हाधिकारी यांच्यामार्फत राज्यसरकारला निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, कोरोनामुळे अगोदरच अडचणीत असलेल्या नागरिकांवर वाढीव वीजदराचा भार पडला आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाला आहे. एप्रील महिन्यापासूनच्या कडक टाळेबंदीमुळे नागरिकांचे अपरिमित आर्थिक नुकसान झाले. व्यवसायांना घरघर लागली. अनेकांनी नौकर्या गमावल्या आणि एका बाजुला कोरोनाची भिती तर दुसरीकडे ठप्प झालेले अर्थकारण या दोन्ही आघाड्यांवर नागरिक लढा देत असतांना सरकारने नागरिकांना प्रचंड वीज बिल पाठवून शॉक दिला. त्यामुळे वीज ग्राहकांचे डोळे पांढरे झाले.
ऐरवी वर्षभराचे वीज देयक जितके येथे तितक्या वीजेची आकारणी केवळ तीन मन्यिाच्या वापराबाबत सरकारने जनतेला पाठवले. एप्रील, मे व जून महिन्यात अनेक खासगी आस्थापनांची कार्यालये बंद होती. तरीही त्यांना भर भक्कम वीज देयक पाठवली. पूर्वी परकीय राजवटीत जिझिया कर लावला जायचा या सरकारने वीज देयकातून जिझिया कर लावला आणि जनतेची लूट केली असा आरोप मनसेने केला आहे. जनतेला आमचे आवाहन आहे की, काहीही झाले तरी ही वाढीव बील देयकं भरु नका असा असहकार पुकारल्या शिवाय सरकारलाही जनतेचा असंतोष दिसणार नाही. सरकारनेही जनतेल गृहीत धरु नये आम्हाला संघर्ष जरी नवीन नसला जरी ही वेळ संघर्षाची नाही याचे भान सरकारने बाळगावे व उगाच वाढीव वीज देयकं पाठवून संघर्ष करु नये अशी मागणी मनसेने निवेदनातून केली आहे.
Leave a comment