भरधाव कार रस्ता दुभाजक ओलांडून टँकरवर आदळली

 

मुलगी पाहण्यासाठी जात असताना काळाचा घाला 

 

गेवराई । वार्ताहर

धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील गेवराई बाह्यवळण रस्त्यावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव कार रस्ता ओलांडून टँकरवर आदळली.अपघातात कारमधील चौघांचा मृत्यू झाला.भीषण अपघाताची ही घटना गुरुवारी (दि.26) सकाळी दहा वाजेच्या सुमारास घडली. माहिती मिळताच महामार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले.कारमधील जखमींना तातडीने गेवराई उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

वंचित आघाडीचे लातूर जिल्हाध्यक्ष सदाशिव भिंगे यांच्यासह संतोष भिंगे,प्रा. सुभाष भिंगे,महादेव सकटे यांचा मृतांमध्ये समावेश आहे तर राम भिंगे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर बीड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.लातूर येथील हे सर्वजण राम भिंगे यांच्या मुलीसाठी स्थळ पाहण्यास गुरुवारी कारमधून क्र. (एम एच 46 बी जी 9700) औरंगाबादला जात होते.  ते गेवराई शहरातील झमझम पेट्रोल पंपाच्या पाठीमागील बाह्यवळण रस्त्यावर आलेले असताना चालकाचा कारवरील ताबा सुटला अन भरधाव कार रस्ता दुभाजक ओलांडून औरंगाबादहून बीडकडे जाणार्‍या इंडियन ऑईलच्या टँकरवर क्रं. (जी जे 16 ए यु 2475) जाऊन आदळली.

या भीषण अपघातात कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तसेच राम भिंगे हे गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच गेवराई पोलिस ठाण्याचे पो.नि. पुरुषोत्तम चोबे, सहाय्यक निरीत्तक्षक संदीप काळे,पो.कॉ.खरात,राठोड,चव्हाण,वरकटे यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल केले.अपघात इतका भीषण होता की, टँकरच्या धडकेत गंभीर मार लागल्याने तिघांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर महामार्गावरील वरील वाहतूक काही वेळ विस्कळीत झाली होती. घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.  

 

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.