दुरुस्तीची वर्क ऑर्डर न काढल्याची सोशल मीडियावर कबुली

माजलगाव । उमेशकुमार जेथलिया

माजलगावचे नूतन नगराध्यक्ष शेख मंजूर यांनी शनिवारी (दि.21) सोशल मीडियावर व्हायरल केलेल्या पोस्ट मधून आचारसंहिता असल्यामुळे फिल्टर दुरुस्ती ची वर्क ऑर्डर काढली नसल्याची कबुली देतानाच दुसर्‍या निविदेच्या वर्क ऑर्डर नुसार  काही उपांगाची दुरुस्ती करून शुद्ध पाणी पुरवठा करण्यात यश मिळवल्याचे लिखित स्वरूपात दिले आहे. यामुळे 35 लाखाची निविदा रद्द करण्याचे बालट त्यांच्यावर येण्याची शक्यता आहे.
एक नगराध्यक्ष म्हणून लेखी दिलेल्या या निवेदनावरून जलशुद्धीकरण दुरुस्तीच्या टेंडरची गरज नसल्याचे आता सिद्ध होत आहे. कारण लिकेज व पाणी पुरवठा व्यवस्थापन निविदे अंतर्गत फिल्टर चे काम करून शुद्ध पाणी पुरवठा करण्यात यश मिळाल्याचे नगराध्यक्ष शेख मंजूर यांनी सोशल मीडियावर लेखी स्वरूपात जाहीर केलेले सर्वांनी वाचले आहे.नगराध्यक्ष साहेब,तुम्ही खरंच माजलगावच्या जनतेशी प्रामाणिक राहणार असाल तर फिल्टर दुरुस्तीची निविदा आता रद्द करा. शुद्ध पाणी माजलगावकराना देण्याच्या तुमच्या प्रयत्नास यश आले असे तुमचे मत आहे; तर 35 लाख रु चे फिल्टर दुरुस्तीचे टेंडर रद्द करण्याची आता डेरिंग करा.लोकप्रश्नांच्या याच पानावर तुमच्या या कामाचे कौतुक आम्ही करू.नाहीतर तुमचे आजचे निवेदन म्हणजे बोलचाच भात आणि बोलचीच कढी असल्याचे सिद्ध होईल आणि माजलगावच्या लोकांची ही शुद्ध फसवणूक ठरेल.एका टेंडर मध्ये 2 काम तुम्ही साध्य केले असेल तर तुमचे नक्कीच अभिनंदन तुमच्यासारखे नगराध्यक्ष राज्यातील सर्व न प ला लाभो. पण जेव्हा 35लाखाचे टेंडर तुम्ही रद्द कराल तेव्हाच तुम्ही माजलगावच्या जनतेच्या कौतुकास पात्र रहाल.आणि आ. प्रकाश सोळंके यांनी आपल्या केलेल्या निवडीचे चीज होईल.नाहीतर सगळं काही व्यर्थ असेल आणि तुमचा खोटारडेपणा उघड होईल.

साहेब,आपण काय लिहिले एकदा वाचून पहा


माजलगावचे नगराध्यक्ष शेख मंजूर हे आपल्या हुजर्‍यामार्फत लिहून घेतलेल्या दोन वेगवेगळ्या पोस्ट आज सोशल मीडियामध्ये फॉरवर्ड करत होते.एकीकडे आचारसंहिता असून वर्क ऑर्डर काढली नाही असेही या पोस्टमध्ये सुरुवातीस लिहिले आणि वर्क ऑर्डर विना काम करत आहे ही अफवा असल्याचे ही या पोस्टमध्ये लिहिले आहे.नगराध्यक्ष साहेब आपण स्वतःच एकदा ती पोस्ट वाचून पहावी अशी चर्चा होत आहे. 

विकास कामात खोडा घालणारांनी रानं हाकु नये

ज्या नूतन नगराध्यक्ष शेख मंजूर यांनी सर्व नगरसेवकांचे सहकार्याने काम मार्गी लागल्याचे या पोस्टमध्ये लिहिले आहे, त्यांनीच सहाल चाऊस व सौ मुंडे यांच्या काळात आम्हा नगरसेवकांवर अविश्वास दाखवत प्रत्येक सर्व साधारण सभेच्या दुसर्‍याच दिवशी या बैठकीवर आक्षेप घेणारे सुमारे 30 ते 40 अर्ज दाखल केलेले आहे.त्यामुळे नगरसेवक तर पूर्वीपासूनच विकास कामात सोबत होते आमच्या चांगुल पना विषयी नूतन नगराध्यक्षांनी बोलण्याची गरज नाही.अशी जळजळीत प्रतिक्रिया नाव न टाकण्याच्या अटीवर आघाडीच्या एका नगरसेवकाने दिली.

वर्क ऑर्डरशिवाय काम करणारे चाऊस पापी कसे?

शुद्धपाणी देण्याचे ‘पुण्या’चे काम वर्क ऑर्डर शिवाय करून आपण माजलगावकरांची वाहवा मिळवण्याचे स्वप्न पाहत आहात तर मग वर्क ऑर्डर शिवाय नगराध्यक्ष चाऊस यांनी नपच्या कर्मचार्‍यांना टेबल खुर्ची केबिन दिली, शादीखान्या ला फरशी बसवली होती तेव्हा आपण चाऊस यांच्या विरोधात वर्क ऑर्डर शिवाय काम केल्याची तक्रार दिली मग हे तुमच्या नजरेत ‘पाप’ कसे? हे जनतेच्या पचनी पडत नाही.याचा अर्थ तुम्ही केलेल्या तक्रारी विकास कामात खोडा घालणार्‍या व नगराध्यक्ष पदावर डोळा ठेवणार्‍या होत्या का?असा सवाल उठत आहे.

जनता खुळी नाही

लवकरच शुद्धपाणी देणार हे नगराध्यक्ष यांनी दिलेले स्टेटमेंट आहे की लोकांनी केलेले कौतुक हे न कळण्या एवढी माजलगावची जनता दूधखुळी आहे असं नगराध्यक्ष यांनी दिलेल्या निवेदनातुन व्यक्त होत आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.