आणखी सात रुग्णांचा मृत्यू;68 जणांना डिस्चार्ज
बीड । वार्ताहर
जिल्ह्यातील कोरोना मृत्यू रोखण्यात आरोग्य विभाग अपयशी ठरत आहे. मंगळवारी (दि.20) आणखी सात रुग्णांच्या मृत्यूची नोंद आरोग्य विभागाच्या पोर्टलवर झाली आहे. त्यामुळे आता एकुण मृत्यूसंख्या 389 झाली आहे. मंगळवारी 68 जणांनी कोरोनावर मात केली तर बुधवारी 87 नवे रुग्ण आढळून आले आहेत.
मंगळवारी आरोग्य विभागाकडे नोंद झालेल्या मृत्यूंमध्ये ढाकेफळ (ता.केज) येथील 80 वर्षीय पुरुष, अंबाजोगाई येथील 60 वर्षीय पुरुष, बीड शहरातील 80 वर्षीय पुरुष, धारुर शहरातील 65 वर्षीय महिला, परळी शहरातील 68 वर्षीय महिला, बागपिंपळगाव (ता.गेवराई) येथील 71 वर्षीय पुरुष आणि रुई नालकोल (ता.आष्टी) येथील 70 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. दरम्यान बुधवारी जिल्ह्यात 1413 जणांची कोरोना चाचणी केली गेली. यामध्ये 1326 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले तर 87 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले. बाधितांमध्ये अंबाजोगाई 06, आष्टी 11, बीड 20, धारुर 2, धारुर2 , वडवणी 2, गेवराई 11, केज 5, माजलगाव 02, परळी 02, पाटोदा 09 आणि शिरुर तालुक्यातील 19 जणांचा समावेश आहे. जिल्ह्यातील एकूण बाधितांचा आकडा 12 हजार 515 इतका झाला असून कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 10 हजार 558 इतकी झाली आहे. आतापर्यंत 389 जणांना कोरेानाने मृत्यू झाला आहे.
Leave a comment