बीड | वार्ताहर
बीड जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या दिवसागणिक वाढू लागली आहे. आज बुधवारी (दि.30) कोरोनाचे तब्बल 204 बाधित रुग्ण निष्पन्न झाले आहेत. नव्याने कोरोना तपासणीसाठी पाठवलेल्या 1214 स्वॅबचे रिपोर्ट आज बुधवारी आरोग्य विभागाला प्राप्त झाले. यात 204 रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत तर 1010 रुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहे.
बाधित रुग्णांमध्ये आष्टी तालुक्यात सर्वाधिक 47, बीड 44, अंबाजोगाई 34, धारुर 6, गेवराई 11, केज 24, माजलगाव 11, परळी 14, पाटोदा 6 आणि शिरुर तालुक्यातील 7 जणांचा समावेश आहे. दरम्यान आजपर्यंत बीड जिल्ह्यात कोरोनाच्या तब्बल 1 लाख 3 हजार 611 संशयित रुग्णांच्या चाचण्या करण्यात आल्या. पैकी 93 हजार 554 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. तर एकुण बाधितांची संख्या आता 10 हजार 54 झाली आहे. तर जिल्ह्यात बरे झालेल्यांचा एकूण आकडा 7 हजार 80 इतका झाला आहे.
Leave a comment