5 ऑक्टोबरला ठरणार सभापतीची पोटनिवडणुक
माजलगाव । वार्ताहर
अशोक डक यांची मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी निवड झाल्याने माजलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पद रिक्त झाले होते. नवीन सभापती कोण याची उत्सुकता माजलगावकराना लागली आहे.कृषी उत्पन्न बाजार समिती च्या सभापती पदाची पोटनिवडणुक 5 ऑक्टोबर ला होणार असून संभाजी शेजुळ की वैजनाथ जाधव या दोघांपैकी एकाची वर्णी लागण्याची शक्यता असून शेजुळ यांचे आजतरी पारडे जड वाटत आहे.
माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश सोळंके निष्ठावंतांना आशिर्वाद देणार की मोहन जगताप यांच्या सोबत पॅच अप चा नवा अध्याय लिहिणार याची उत्सुकता शहरासह तालुक्यात निर्माण झाली आहे. खरात आडगाव चे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक शिवाजीराव शेजुळ यांनी प्रत्येक निवडणुकीत कशाची आशा न करता एक निष्ठेने आ. प्रकाश सोळंके यांचा सोबत राजकारणात पिढ्यानपिढ्या अखं आयुष्य घातलं त्यांच्या कामाची पावती म्हणून आ. सोळंके हे शिवाजी शेजुळ यांचे सुपुत्र संभाजी (भारत) शेजुळ यांना माजलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक केले आणि आता माजलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती ची जागा रिक्त झाल्याने कोणाची वर्णी लागते याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.यात संभाजी शेजुळ की वैजनाथ जाधव या निष्ठावतांना निष्ठतेचे फळ की मोहन जगताप यांच्या कार्यकर्त्यांना न्याय देऊन पॅच अप होणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. वंगीचे वैजनाथ जाधव यांनी राष्ट्रवादी मध्ये प्रवेश करून पडत्या काळात आ.सोळंक यांना आजपर्यंत साथ दिली. आ.प्रकाश सोळंके यांनी आज पर्यंत निष्ठावंतांनाच न्याय दिला आहे. सभापती पदासाठी कृउबासचे संचालक संभाजी शिवाजीराव शेजुळ व वांगी चे वैजनाथ जाधव तर उपसभापती पदासाठी संतोष यादव व मथुरादास घायतिडक यांची नावं चर्चेत आहेत. आ.सोळंके 5 ऑक्टोबर रोजी माजलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदि निष्ठावंत कार्येकर्त्याचीच वर्णी लावतात हे कळेल.
पक्षांतर करणारे भोसले ठरले असते सभापती
कृउबा चे उपसभापती नीलकंठ भोसले यांनी विधानसभा निवडणुकीत सतेच्या हव्यासापोटी पक्षांतर केले. मात्र त्यांचं नशीब फुटके निघाले. आ.सोलंके यांच्याशी निष्ठा ठेवल्या असत्या तर आज सभापती पदाची माळ त्यांच्याच गळ्यात राहिली असती.
Leave a comment