जिल्ह्यात रॅपिड अ‍ॅन्टीजन चाचण्यांची मोहिम सुरु

बीड । वार्ताहर

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सोमवारपासून (दि.14) जिल्ह्यातील 4 शहरांसह 40 गावांमध्ये व्यापारी आणि कंटेनमेंट झोनमधील नागरिकांची तपासणी मोहिम आरोग्य विभागाने घेतली आहे. 14 ते 16 सप्टेंबर अशी तीन दिवस ही मोहिम चालेल. सोमवारी पहिल्या दिवशी 6055 नागरिकांची चाचणी झाली यात 228 जण कोरोना बाधित आढळून आले.

बीडच्या पाच गावात 42 रुग्ण

बीड तालुक्यात नवगण राजूरी, पिंपळनेर, नाळवंडी, नेकनूर आणि चौसाळा येथे रॅपिड अ‍ॅन्टीजन चाचण्या केल्या गेल्या. नवगणराजूरी येथे 218 जणांची तपासणी केली गेली यात 06 जण बाधित सापडले तर चौसाळा येथे 428 जणांची तपासणी केली गेली यात 17 जण बाधित सापडले. नेकनूर येथे 269 नागरिकांची तपासणी झाली, यात 7 जण बाधित निष्पन्न झाले.पिंपळनेरमध्ये 174 जणांची तपासणी होवून 7 कोरोना बाधित ठरले, तर नाळवंडी येथे 167 जणांची तपासणी झाली. यातील 5 जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नरेश कासट यांनी दिली.

शिरूरमध्ये 50 जण बाधित

शिरुर शहरात दिवसभरात 822 जणांची तपासणी झाली 50 जण बाधित आढळून आले.सकाळी 8 वाजेपासून शहरातील व्यापार्‍यांची जिल्हा परिषद माध्यमिक शाळेतील केंद्रावर गर्दी केली. नगरपंचायतचे सीओ किशोर सानप, डॉ.शिवनाथ वाघमारे,टीएचओ डॉ.अशोक गवळी हे प्रक्रियेवर लक्ष ठेऊन होते. 40 कर्मचारी यासाठी कार्यरत होते. 

पाटोद्यात 28 बाधित निष्पन्न

पाटोदा शहरात नगर पंचायत कार्यालय,जय भवानी विद्यालय आणि जि.प. कन्या शाळा या तीन बुथवर रॅपिड अँटीजन चाचणी मोहिम राबवली गेली. व्यापार्‍यांनी तपासणीला प्रतिसाद दिला.दिवसभरात 790 जणांच्या चाचण्या झाल्या. यामध्ये 28 जण बाधित रुग्ण आढळले. यात 20 रुग्ण हे पाटोदा शहरातील आहेत तर उर्वरित 8 मध्ये कुसळंब, डोंगरकिन्ही, सौताडा  येथील रुग्णांचा समावेश आहे. 

तेलगावमध्ये 27 बाधित

धारुर तालुक्यातील तेलगावमध्ये 534 जणांची तपासणी करण्यात आली. यात 25 जण पॉझिटिव्ह आले अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सचिन शेकडे यांनी दिली.  धारुर तालुक्यात कोरोनाचा प्रसार वाढत असून आतापर्यंत अडीचशेहून अधिक बाधित सापडले आहेत. तर 10 जणांचा मृत्यू झालेला आहे.अ‍ॅटीजन चाचणीत पॉझीटीव्ह आलेल्या रुग्णांना कोविड सेंटरमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले.33 कर्मचार्‍यांचा टीम ही मोहीम पार पाडत आहे.

गेवराईतील तीन गावात 22 बाधित

गेवराई तालुक्यात चकलांबा, मालेगाव (खूर्द) आणि मालेगाव बुद्रूक या तीन गावांमध्ये रॅपिड अ‍ॅन्टीजन चाचणी मोहिम राबवली.चकलांब्यात 141 जणांची चाचणी केली गेली यात 11 जण बाधित सापडले. मालेगाव बुद्रूकमध्ये 148 जणांची तपासणी केली गेली यात 10 जण बाधित सापडले तर मालेगाव खुर्दमध्ये केवळ 77 जणांची तपासणी झाली यात 01 जण बाधित सापडला. तीन गावात मिळून 22 जण बाधित आढळून आल्याचे टीएचओ डॉ. संजय कदम यांनी सांगितले.

आडस 2,राजेवाडी 3, टाकरवणला 1 रुग्ण 

केज तालुक्यातील आडस येथे 260 व्यापार्‍यांची अँटीजेन टेस्ट केली गेली. त्यात 2 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विकास आठवले यांनी दिली. माजलगाव तालुक्यातील टाकरवणमध्ये 168 जणांची चाचणी झाली यात 1 जण बाधित सापडला तर राजेवाडीत 50 जणांची तपासणी झाली यात 3 जण बाधित सापडले. असे टीएचओ अनिल परदेशी यांनी सांगितले.

सिरसाळ्यात 17 जण बाधित 

परळी तालुक्यातील सिरसाळ्यात राबवलेल्या तपासणी मोहिमेत दिवसभरात 548 नागरिकांची तपासणी करण्यात आली. यात 17 जण कोरोनाबाधित आढळून आले. कोरोनाचा धोका टाळण्यासाठी यंत्रणेने व्यापार्‍यांना चाचणी बंधनकारक केल्यामुळे चाचणी करून घेण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. येथील न्यू हायस्कुल शाळेमध्ये लोकांनी रांगा लावून टेस्ट करून घेतली.एकूण.548 टेस्ट करण्यात आल्या त्यापैकी 17 पॉझिटिव्ह सापडल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ.सोमनाथ मुंडे यांनी दिली. 

वडवणीत 770 चाचण्यात 24 बाधित

वडवणी शहरात कोवीड केअर सेंटर व छत्रपती राजर्षी शाहू महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात सोमवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत 770 जणांची रॅपिड अँटीजन चाचणी केली गेली. यात 24 जण बाधित आढळून आले अशी माहिती टीएचओ मधुकर घुबडे यांनी दिली आहे.नगर पंचायतीच्या वतीने वाहनातून शहरभर ध्वनीक्षेपकाद्वारे चाचणी करवून घेण्यासाठी आवाहन केले जात होते. 

आष्टीतील दोन गावात 9 रुग्ण

सोमवारी आष्टी तालुक्यातील जामगाव व धामणगाव या गावात रॅपिड अ‍ॅन्टिजेन टेस्ट घेण्यात आली. जामगाव येथे 132 जणांची तपासणी झाली. यात 3 जण बाधित निष्पन्न झाले. तसेच धामणगाव 217 जणांची तपासणी करण्यात आली. यामध्ये 6 बाधित रुग्ण सापडले.

बर्दापूर,आपेगावात 5 रुग्ण सापडले

अंबाजोगाई तालुक्यातील आपेगाव व बर्दापूर या 2 गावातही रॅपिड अ‍ॅन्टिजेन टेस्ट घेण्यात आली. दोन्ही ठिकाणी 60 जणांची तपासणी झाली. आपेगाव येथे 36 जणांच्या तपासणीत 1 रुग्ण निष्पन्न झाला तर बर्दापूरमध्ये 26 जणांची तपासणी करण्यात आली. यामध्ये 4 रुग्ण कोरोनाबाधित निष्पन्न झाले. 

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.