26 हजार क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग,
गोदावरीला महापुर येण्याची शक्यता? हजारो नागरिक भयभीत
गेवराई । अय्युब बागवान
पैठण येथील जायकवाडी धरण 100 टक्के भरले असून अजुनही धरणात पाणी मोठ्या प्रमाणात येत असल्याने धरणाचे 18 दरवाजे दिड फुटाने उंचीवर उघडले असून 25152 क्युसेक्सने पाणी गोदावरीच्या पात्रात सोडण्यात आले आहे.गोदावरी दुथडी भरून वाहत आहे. उद्यापर्यंत गोदावरीच्या पात्रात पाणी झपाट्याने वाढेल त्यामुळे महापुर येण्याची शक्यता बळावली आहे.त्यामुळे गोदाकाठचे रहिवासी भयभीत झाले आहेत.
जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाण्याची अवाक मोठ्या प्रमाणात वाढली आहे.धरण पूर्णपणे भरले आहे. सांडव्यामधून पाणी पडत आहे.यामुळे वरिष्ठ अधिकार्यांच्या सूचनेवरुन आधी 18 दरवाजे 1 फुट उघडून 18 हजार 864 क्युसेक्सने गोदावरी पात्रात पाणी सोडले जात होते, त्यात पुन्हा रविवारी (दि.13) वाढ करण्यात आली असून आता आणखी अर्धा फुटाने 18 दरवाजे उंचीवर घेवून 6 हजार 288 क्युसेकने पाण्याचा विसर्ग वाढवल्याने नदी पात्रातील पाण्यात मोठी वाढ झाली आहे.
गेवराई तालुक्यातील अनेक गांव गोदाकाठी वसलेले आहेत.नदीला जास्त पाणी आले किंवा सोडले तरी अनेक गांवाना पाण्याचा वेढा पडतो गांव पाण्याखाली जातात,गांवकर्याचा संपर्क तुटतो,जनजीवन विस्कळीत होते हा पूर्वानुभव असल्याने नागरिकांची भीतीने गाळण उडाली असून पुर आला तर कसे होणार? या चिंतेने नागरिक हवालदिल झाले आहेत.धरणातून मोठ्या प्रमाणात गोदावरी पात्रात पाणी सोडले गेले आहे. नीदत पाण्याची बेसुमार वाढ झाली असून पुर ही येण्याची दाट शक्यता आहे.जायकवाडी धरणात पाण्याचा ओघ असाच वाढत राहिला तर गोदावरीत पाणी अधिक पटीने सोडावे लागेल त्यामुळे महापुरही येईल गोदाकाठी असलेले गावात हाहाकार माजेल. नागसरिकांना सुरक्षितस्थळी पोहचवण्यासाठी प्रशासनला मोठे परिश्रम घ्यावे लागतील आणि ते घेतीलही, पण आतापासुनच बाधित गावकर्यांनी यांची काळजी घेवून दुसरीकडे राहण्याची व्यवस्था करावी असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते करत आहेत. प्रशासनही सतर्क आहे.गावकरीही सज्ज आहेत,परिस्थिती बिघडली तर दुसरीकडे स्थलांतर करण्याच्या हालचाली गांव पातळीवर सुरु असल्याचे समजते.
Leave a comment