बीड । वार्ताहर
जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येत भर पडण्याची मालिका सुरुच असून शनिवारी (दि.12) नवीन 102 रुग्ण आढळले. एकूण रुग्णसंख्या सहा हजार 497 इतकी झाली आहे. शनिवारी आणखी तीन मृत्यूंची नोंद आरोग्य विभागाच्या पोर्टलवर झाली. यात दोन महिला व एका पुरुषाचा समावेश आहे.
शनिवारी बीड जिल्ह्यात 1 हजार 305 जणांचे स्वॅब तपासणीसाठी अंबाजोगाईतील प्रयोगशाळेत पाठविले होते. रात्री अहवाल प्राप्त झाले. यातील 1203 अहवाल निगेटिव्ह आले असून उर्वरित 102 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. बाधित रुग्णांमध्ये बीड तालुक्यात 21, अंबाजोगाई 17, आष्टी, माजलगाव, गेवराई प्रत्येकी 9, धारुर 10, केज 16, परळी 6, वडवणी 4 व पाटोद्यातील एका रुग्णाचा समावेश आहे. दरम्यान, शनिवारी आणखी तीन मृत्यूंची नोंद झाली आहे. यात बीड शहरातील धांडे गल्लीतील 60 वर्षीय महिला, आष्टी तालुक्यातील कडा येथील 82 वर्षीय महिला व परळी तालुक्यातील नांदगाव येथील 70 वर्षीय पुरूषाचा समावेश आहे. आता जिल्ह्यातील एकूण मृत्यूसंख्या 191 झाली आहे. दरम्यान, शनिवारी 77 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. त्यामुळे कोरोनामुक्त रुग्णांची संख्या 4 हजार 393 एवढी झाली आहे.



ई-पेपर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a comment