मुंबई  -

 सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या रिया चक्रवर्ती हिने NCB समोर धक्कादायक खुलासे केले असल्याची माहिती समोर येत आहे. NCB ने CNN-NEWS18 ला दिलेल्या माहितीनुसार, रियाने एनसीबीला दिलेल्या 20 पानांच्या कबुली जबाबात गंभीर खुलासे केले आहेत. तिचं विधान 16/2020 च्या प्रकरणात नोंदवलं गेलं आहे. रियाच्या कबुलीनंतर आता या प्रकरणाला वेगळं वळण लागणार आहे. कारण यामध्ये रियाने अनेक प्रसिद्ध अभिनेत्यांची नावं घेतली असल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रियाने केलेले खुलासे हे एनडीपीएस अधिनियम कायदा 67 अन्वये अंतर्गत आहेत. रियाच्या कबुलीजबाबानुसार, बॉलिवूडमधील अनेकांनी सुशांतबरोबर ड्रग्जचं सेवन केलं होतं. ही पार्टी नेमकी कुठे झाली होती. याचीही माहिती रियाने चौकशीत दिली आहे.

लोणावळा इथल्या सुशांतच्या फार्म हाऊस बॉलिवूडमधील त्याच्या मित्रांनी ड्रग पार्टी वापरला होता. तर या पार्टीमध्ये रियासुद्धा होती का? असा सवाल केला असता तिने आपण या पार्टीमध्ये नसल्याचं सांगितलं आहे. यावेळी रियाने 2 प्रसिद्ध पुरुष कलाकारांची नावंही NCB दिली आहेत. यामध्ये तिने काही छोट्या कलांकारांचीही नावं घेतली आहे. ज्यांचा आता NCB कडून कसून तपास होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

दरम्यान, या प्रकरणात रियाने एका फिल्ममेकरचंही नाव दिलं आहे. ज्याने सुरुवातीला सुशांतची सगळ्यांना ओळख करुन दिली आणि त्याला कोकेन आणि LSD पार्टीमध्ये नेलं. रियाचा असा दावा आहे की, सुशांतने तिला डेट करताना याबद्दल सांगितलं होतं. रियाने दिलेल्या संपूर्ण माहितीनंतर आता एनसीबी KJ नावाच्या माणसाचा शोध घेत आहे. तो लोणावळ्यातील सुशांतच्या फार्महाऊसमध्ये ड्रग्स सप्लाय करत होत.

 

रियाने आपल्या 20 पानांच्या कबुली जबाबात असंही म्हटले आहे की, सुशांतला बायपोलर सिंड्रोम होता. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाचा आता NCB कडून शोध सुरू आहे. रियाने दिलेल्या माहितीवरून आज NCB च्या पथकाने गोवा आणि मुंबईमध्ये 5 ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. गेल्या काही दिवसांआधी रिया आणि तिचा भाऊ शौविक यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, NCB ने ही छापेमारी केली असल्याचं समोर येत आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, छापेमारी झालेल्या 5 ठिकाणांचा ड्रग्ज सप्लाय करण्यासाठी वापर होत होता. इतकंच नाही तर चौकशीमध्ये रियाने काही मोठ्या बॉलिवूड स्टार्सचीही नावं घेतली आहे. याबद्दल अद्याप अधिकृत पुष्टी झाली नसली तरी यातून मोठं रॅकेट समोर येणार असल्याचं दिसतं आहे. ड्रग्ज प्रकरणात बॉलिवूड कनेक्शन असलेल्या 5 ठिकाणी हे छापे टाकण्यात आले आहेत. यामध्ये NCB पथकाच्या हाती नेमकी कोणती माहिती लागली आहे, याबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

ड्रग्स सेवन प्रकरणातील ५ सेलिब्रिटींची नावं

. आता या सर्वांची चौकशी होण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या म्हणण्यानुसार रियाने चौकशी दरम्यान ज्या सेलिब्रिटींची नावं घेतली आहेत, त्यामध्ये अभिनेत्री सारा अली खानचं देखील नाव आहे.  

सारा अली खानने अगदी कमी वयात कलाविश्वात आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. ड्रग्स प्रकरणातील यादीमध्ये सारा पहिल्या क्रमांकावर आहे. तर दुसऱ्या नंबरवर अभिनेत्री रकुल प्रित सिंगचं नाव आहे. रियाने २० पानांच्या जबाबात रकुलचा उल्लेख केला. 

तिसऱ्या स्थानावर डिझायनर सिमोन खंभाटा आहे. तर चौथ्या स्थानावर सुशांतची मैत्रीण आणि रेनड्रॉप मीडियाची फाऊंडर रोहिणी अय्यर आहे. पाचव्या स्थानी 'दिल बेचारा' चित्रपटाचा दिग्दर्शक मुकेश छाब्रा आहे. 

 

 

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.