चोंरबा-थेटेगव्हाण रस्त्यावरील घटना
धारुर । वार्ताहर
खामगाव-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावरील चोंराबा ते थेटेगव्हाण दरम्यान कार टमटम व दुचाकी या तीन वाहनांची अरूंद रस्त्यावर धडक झाली. सोमवारी (दि.10) दुपारी झालेल्या या तिहेरी अपघातात दोघे गंभीर जखमी झाले. दरम्यान सततच्या अपघातामुळे वाहन चालकात भीतीचे वातावरण आहे.
धारूर तेलगाव दरम्यान राष्ट्रीय महामार्गावर धुनकवड पाटी ते धारूर दरम्यान घाट असताना अरूंद रस्ता ठेवला आहे. जुन्याच रस्त्यावर डांबरीकरण करून रस्ता चकाचक केला आहे; मात्र वाहनांचा वेग व वर्दळ वाढल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. रविवारी दुपारीच धारूर घाटात गॅस घेवून जाणार्या टँकरचा अपघात झालेला असताना सोमवारी दुपारी चोरंबा ते थेटेगव्हाण दरम्यान एका हॉटेलसमोर कार क्र.(एम.एच.26 ए.एफ.3358), मालवाहतूक पिकअप क्र.(एम.एच.49 ए.टी. 2382) व दुचाकी क्र.(एम.एच.25 झेड 4587) या वाहनांचा तिहेरी अपघात जाला. यात दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी झाले. उपचारासाठी त्यांना अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनास्थळी सहायक निरीक्षक पालवे यांनी भेट दिली.
Leave a comment