मुंबई -

 पोलिस दलातील बदल्यांतील निर्णयाच्या गोंधळामुळे सत्ताधारी महाविकास आघाडीतील मतभेद चव्हाट्यावर आल्याची चर्चा रंगली आहे. त्यात मुंबई पोलिस दलात पुन्हा एकदा खांदेपालट करण्यात आली आहे. 9 पोलिस उपायुक्तांच्या प्रशासकीय कारणास्तव बदल्या करण्यात आल्या आहेत. दरम्यान, या आधी आठ उपायुक्तांच्या बदल्या झाल्या होत्या. त्यातील काही अधिकारी यांच्या पुन्हा बदल्या झाल्या आहेत.

मुंबईतील पोलिस उपायुक्तांच्या बदली नंतर पोलिस दलातील वरिष्ठ अधिकारी मुख्यमंत्र्यांना भेटायला वर्षावर दाखल झाले आहेत. राज्य पोलिस महासंचालक सुबोध जयस्वाल आणि मुंबई पलिस आयुक्त परमबीर सिंग हे वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी आले आहेत.

 

या पोलिसा अधिकाऱ्यांच्या झाल्या बदल्या...

परमजीत सिंग दहिया - परीमंडळ 3 

प्रशांत कदम - परीमंडळ 7

गणेश शिंदे - पोर्ट झोन ( बंदरे )

रश्मी करंदीकर - सायबर सेल

शहाजी उमप - विशेष शाखा 1 

मोहन दहिकर - लोकल आर्मस ताडदेव

विशाल ठाकूर - परीमंडळ 11

प्रणय अशोक - परीमंडळ 1

नंदकुमार ठाकूर - क्राईम ब्रांच ( डिटेंशन )

 

तडकाफडकी रद्द  झाल्या होत्या बदल्या... 

मुंबई पोलिस दलातील 8 पोलिस उपायुक्तांच्या गेल्या आठवड्यात करण्यात आलेल्या बदल्या गृह विभागाने रविवारी तडकाफडकी रद्द केल्या होत्या. यावरून सत्ताधारी महाविकास आघाडीतील मतभेद चव्हाट्यावर आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली होती.

नवी मुंबई व ठाणे महापालिकेतील आयुक्तांच्या दोन आठवड्यांपूर्वी झालेल्या बदल्यांमुळे प्रशासनातील वाद उघडकीस आला होता. त्यानंतर कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन मुंबई शहरात दोन किमी अंतरातच मुंबईकरांनी जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करावी, असा आदेश काढून अनेक वाहनधारकांवर पोलिसांनी कारवाई केली होती. ही कारवाई पोलिस आयुक्तांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेवरून केली होती.

 

मात्र, त्या निर्णयाची माहिती गृहमंत्र्यांना नव्हती. यास गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आक्षेप घेतल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर गृहमंत्र्यांनी मुंबई पोलिस दलातील उपायुक्तांच्या बदल्या केल्या. बदली झालेल्या ठिकाणी तत्काळ पदभार स्वीकारा, असेही त्या आदेशात नमूद करण्यात आले होते. मात्र, लगेचच रविवारी बदली रद्द करण्यात आल्याचे आदेश गृह विभागाच्या वतीने जारी करण्यात आले होते.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.