नवी दिल्ली
ICSE बोर्डाने दहावी आणि बारावी परीक्षांचे निकाल उद्याच घोषित होणार, असं जाहीर केलं आहे. द कौन्सिल फॉर इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन (CISCE) ने शुक्रवार 10 जुलैला त्यांच्या वेबसाईटवर निकाल जाहीर होतील, असं सांगितलं आहे. result.cisce.org या बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर उद्या दुपारी 3 वाजता निकाल जाहीर होईल, असं प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी, बारावीच्या निकालाची तारीख जाहीर केल्याची बातमी काही वेळापूर्वी समोर आली होती. मात्र ही बातमी खोटी असल्याची माहिती समोर आलं. त्यापाठोपाठ ICSE ने मात्र खरोखरच त्यांच्या निकालाच्या तारखेची घोषणा केली आहे.
कसा बघायचा निकाल
ICSE चा निकाल उद्या दुपारी 3 नंतर बोर्डाच्या वेबसाईटवर जाहीर होईल. त्यासाठी https://results.cisce.org/ किंवा www.cisce.org या वेबसाईटला भेट द्या.
बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर https://www.cisce.org/ जा
तिथे Career पोर्टलला क्लिक करा आणि यावर्षीच्या तुमच्या परीक्षेची कॅटेगरी निवडा
त्यानंतर रोल नंबर आणि इतर माहिती भरा
Print Result किंवा डाऊनलोड रिझल्ट असा पर्याय येईल
इथे थेट तुम्ही तुमचा निकाल पाहू शकता.
Leave a comment