औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाचा विळखा घट्टच होत असून संसर्गाच्या वेगाला चाप बसता बसेना
औरंगाबाद । वार्ताहर
सायंकाळी ७ ते पहाटे ५ वाजेपर्यंत संचारबंदी लागू
आजपासून १५ जुलैपर्यंत सायंकाळी ७ ते पहाटे ५ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे . वारंवार आवाहन करूनही नागरीक रात्री उशीरापर्यंत चौका चौकात रस्त्यावर गप्पा मारताना दिसत असल्यामुळे संचारबंदीचा कालावधी वाढविण्यात आल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.
आठ कोरोनाबाधितांचा मृत्यू, 261 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर
औरंगाबाद जिल्ह्यात आजपर्यंत 2969 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज 112 जणांना सुटी दिलेल्या रुग्णांमध्ये मनपा हद्दीतील 65, ग्रामीण भागातील 47 जणांचा समावेश आहे. आज एकूण 261 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली. यामध्ये औरंगाबाद मनपा क्षेत्रातील 181, ग्रामीण भागातील 80 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. या रुग्णांमध्ये 153 पुरूष, 107 महिला व अन्य एक आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात 6043 कोरोनाबाधित आढळले आहेत, तर 279 जणांचा मृत्यू झाला आहे. तर एकूण 2795 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
सायंकाळनंतर आढळलेल्या 12 रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्णसंख्या आहे.) आहे. यामध्ये दहा पुरूष आणि दोन महिला रुग्णांचा समावेश आहे. औरंगाबाद मनपा हद्दीतील रुग्ण (8) कांचनवाडी (1), मोमीनपुरा (1), हनुमान नगर (1), नवाबपुरा(1) एमजीएम क्वार्टर परिसर (1), भानुदास नगर (1), मनपा परिसर (1), एन सहा, सिडको, मथुरा नगर (1) ग्रामीण भागातील रुग्ण (4) रायगाव, कन्नड (2), पैठण (1), तोंडुली, पैठण (1) या भागातील कोरोनाबाधित आहेत.
आठ कोरोनाबाधितांचा मृत्यू
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) एक जुलै रोजी रांजणगावातील 50 वर्षीय् पुरूष, शहरातील बेगमपुर्यातील 69 वर्षीय् स्त्री, एन सहा, अविष्कार कॉलनीतील 55 वर्षीय् पुरूष, हर्ष नगर 70 वर्षीय् स्त्री, सिल्लोडमधील 47 वर्षीय पुरूष, एन अकरा मधील सुभाषचंद्र बोस नगरातील 71 वर्षीय स्त्री कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आतापर्यंत घाटीत 217 जणांचा मृत्यू झाला. त्यापैकी 212 कोरोनाबाधित औरंगाबाद जिल्ह्यात वास्तव्यास होते. तर शहरातील खासगी रुग्णालयात शहागंजमधील 71 वर्षीय पुरूष, तानाजी नगरातील 56 वर्षीय पुरूष रूग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंत घाटीत औरंगाबाद जिल्ह्यातील 212, औरंगाबाद शहरातील विविध खासगी रुग्णालयांमध्ये 66, मिनी घाटीमध्ये 01 अशा एकूण 279 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.
राज्यात आज कोरोनाचे सर्वाधिक 6330 रुग्ण वाढले
आज राज्यात कोरोनाच्या 6330 रुग्णांची वाढ झाली आहे. आज राज्यात 125 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून गेल्या 48 तासात 110 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 15 रुग्णांचा मृत्यू हा मागील कालावधीतील आहे. राज्यात मृत्यूदर आता 4.38 टक्के झाला आहे.
आज राज्यात 8018 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर आतापर्यंत 1,01,172 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात आतापर्यंत 10,20,368 रुग्णांचे नमुने पाठवण्यात आले, ज्यापैकी 1,68.626 रुग्णांचे नमुने पॉझिटीव्ह आले आहेत. राज्यात रिकव्हरी रेट आता 54.21 टक्के इतका झाला आहे.
सध्या राज्यात 5,72,032 जण होम क्वांरटाईन आहेत तर 41,741 लोक संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात सध्या कोरोनाचे 77,260 रुग्ण अॅक्टीव्ह आहेत. ज्यांचावर उपचार सुरु आहे.
Leave a comment