औरंगाबाद जिल्ह्यात आज 206 रुग्णांची वाढ

मुंबई :

मुंबईतील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी नेमण्यात आलेल्या टास्क फोर्सच्या धर्तीवर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात तज्ज्ञ डॉक्टरांचे टास्क नियुक्त केले जाणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी हा निर्णय घेतला आहे. 

प्रत्येक जिल्हात नियुक्त करण्यात येणार्‍या या टास्कफोर्समध्ये डॉक्टर्स, वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ यांचा समावेश करण्यात येणार आहे. कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपचार, उपाययोजना त्याचप्रमाणे सर्व संबंधित यंत्रणांमध्ये समन्वय ठेवणे आणि त्यांचे नियंत्रण करण्यासाठी जिल्हास्तरावर हा टास्कफोर्स  काम करणार आहे. 

प्रत्येक जिल्ह्यात असे टास्क फोर्स नियुक्त करण्याच्या सूचना राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यत आल्या आहेत.

 

औरंगाबाद जिल्ह्यात आज 206 रुग्णांची वाढ

  औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी  206 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. त्यामध्ये 122 पुरूष, 83 महिला व अन्य एक आहेत. आतापर्यंत एकूण 5988 कोरोनाबाधित आढळले असून 2857 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. 271 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता 2860 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.परीक्षण करण्यात आलेल्या 1200 स्वँब पैकी 206 अहवाल सकारात्मक (Positive ) आल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.  आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे. 
औरंगाबाद मनपा हद्दीतील रुग्ण (171)
सिडको (1), गजानन नगर, गारखेडा (1), काबरा नगर, गारखेडा (1), फुले नगर, उस्मानपुरा (1), नारळीबाग (2), पुंडलिक नगर (4), सिडको एन-अकरा (3), मिसरवाडी (2), शिवाजी नगर (6), सुरेवाडी (1), जाधववाडी (5), सातारा परिसर (3), छावणी (5), द्वारकापुरी, एकनाथ नगर (6), आयोध्या नगर (2), नवनाथ नगर (1),  रायगड नगर (2), उल्कानगरी (1), शिवशंकर कॉलनी (10), एन बारा टी व्ही सेंटर (3), पोलिस कॉलनी, पडेगाव (5),बेगमपुरा (1), मेडिकल क्वार्टर परिसर (1), रवींद्र नगर (2), पडेगाव (2), बायजीपुरा (3), समता नगर (1), मयूर पार्क (1), नागेश्वरवाडी (1), रोकडिया हनुमान कॉलनी (1), कृष्णा नगर, बीड बायपास (1), ज्योती नगर (1), एन सात सिडको, बजरंग चौक (2), हनुमान नगर (7), उस्मानपुरा (2), भोईवाडा (2), बन्सीलाल नगर (1), कुंभारवाडा (2), रमा नगर (1), शांतीनिकेतन कॉलनी (1), भाग्य नगर (10), सौजन्य नगर (1), कांचनवाडी (13), नाथ नगर (3), राहुल नगर (6), देवळाई परिसर (1),हायकोर्ट परिसर (1), राम नगर (1), नवजीवन कॉलनी (1), अल्तमश कॉलनी (1), ठाकरे नगर (3), एन दोन सिडको (1), एन सहा सिडको (2), सावंगी हॉस्पीटल परिसर (1), सावंगी, हर्सुल (2), न्याय नगर (1), एन नऊ सिडको (2), विशाल नगर (3), एसटी कॉलनी (6), सेव्हन हिल (1), गांधी नगर (2), गुरु सहानी नगर (1), टीव्ही सेंटर (1), सदाशिव नगर (1), एकनाथ नगर (1), खोकडपुरा (1), मुकुंदवाडी (1), द्वारकानगरी, एन अकरा (1), एन बारा, हडको (2), नूतन कॉलनी (1), अन्य (1)

ग्रामीण भागातील रुग्ण (35)
शिवाजी नगर, वाळूज (1), शरणापूर (2), चिरंजीव सो,लोकमान्य चौक, बजाज नगर (3), सिडको महानगर (2), कमलापूर, बजाज नगर (1), जीएम नगर, रांजणगाव (1), एसटी कॉलनी, बजाज नगर (1), पाण्याच्या टाकीजवळ, बजाज नगर (1), म्हाडा कॉलनी, बजाज नगर (1), आयोध्या नगर, बजाज नगर (1), अनिकेत सो., बजाज नगर (1), चिंचबन कॉलनी (1), नागापूर कन्नड (1) कोहिनूर कॉलनी (1), गंगापूर माळूंजा (1), वाळूज गंगापूर (3), अरब गल्ली गंगापूर (3), दर्गाबेस वैजापूर (10) या भागातील कोरोनाबाधित आहेत. 

 

 

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.