नाशिक । वृत्तसंस्था
मुंबईमध्ये साखळी बॉम्बस्फोट घडवून अवघ्या देशाला हदरविणार्या बॉम्बस्फोटातील प्रमुख आरोपी युसूफ मेमन याचा नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात मृत्यू झाला आहे. यामुळे अंडरवल्ड जगतामध्ये अर्थात मुंबईत खळबळ माजली असून त्याच्या मृत्यूचे नेमके कारण काय? हे शोधण्यासाठी त्याचा मृतदेह धुळे येथील रूग्णालयात पाठविण्यात आला आहे.1993 मध्ये मुंबईमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात मेमन हा आरोपी होता. डॉन टायगर मेमनचा तो भाऊ आहे.
औरंगाबाद कारागृहातून 2018 मध्ये नाशिक रोड मध्यवर्ती कारागृह रवानगी करण्यात आली होती. औरंगाबाद कारागृहाच्या पूर्वी मेमन 1993 पासून मुंबईच्या आर्थर रोड कारागृहात शिक्षा भोगत होता. 1993 साली मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपींपैकी एक असलेल्या युसुफ अब्दुल रज्जाक मेमनचा शुक्रवारी (दि.26) दुपारी जिल्हा शासकिय रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. 2018 सालापासून मेमन नाशिक रोड येथील मध्यवर्ती कारागृहात आजीवन कारावासाची शिक्षा भोगत होता. युसुफच्या मृतदेहाचे शवविच्छेदन धुळे येथील शासकिय महाविद्यालयात केले जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
Leave a comment