औरंगाबाद । वार्ताहर
येथील सिद्धार्थ उद्यानाच्या प्राणिसंग्रहालयातील आजारी करिना वाघिणीचा आज सकाळी साडेपाचच्या सुमारास मृत्यू झाला आहे. या वाघिणीच्या उपचारांसाठी कालच परभणीतून तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक दाखल झाले होते. पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे २ तज्ज्ञ डॉक्टरांचा यात समावेश होता. सध्या वाघिणीचे शवविछेदन सुरू असल्याचे उद्यानातर्फे कळवण्यात आले आहे.
सिद्धार्थ प्राणीसंग्रहालयात एकूण 12 वाघ होते. येल वाघांची संख्या अधिक झाल्याने 11 फेब्रुवारी रोजी मुंबईच्या वीर माता जिजाबाई भोसले प्राणीसंग्रहालयात शक्ती करिष्मा ही वाघांची जोडी पाठविण्यात आली आहे. त्यामुळे सध्यस्थितीत औरंगाबादच्या या प्राणीसंग्रहालयात दहा वाघ शिल्लक आहेत. यापैकी ही करिना नावाची सहा वर्षांची वाघीण आहे. ती मागील काही दिवसांपासून आजारी असल्याने तिच्यावर उपचार सुरू होते. दोन दिवसांपासून तिने अन्न ग्रहण करणेही सोडले होते त्यामुळे तिला सलाईनवरच जगविले जात होते.
करीना वाघिणीचा अखेर मृत्यू
औरंगाबादेतील सिद्धार्थ उद्यानातील प्राणिसंग्रहालयात आजारी असणाऱ्या करिना वाघिणीचा उपचारादरम्यान बुधवारी पहाटे पाचच्या सुमारास मृत्यू झाल्याची माहिती परभणी येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता तथा प्राचार्य नितीन मार्कंडेय यांनी बोलताना दिली.
औरंगाबादच्या सिद्धार्थ उद्यानातील सहावर्षीय करिना वाघीण रविवारपासून आजारी होती. या वाघिणीवर उपचार सुरू होते. वाघिणीची कोरोना चाचणीही करण्यात आली असून त्याचा अहवाल अद्याप आला नसला तरी तो आल्यानंतर स्पष्ट होणार आहे. दरम्यान. परभणी येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. गोविंद गंगणे, डॉ. शफी तौहिक यांचे पथक रात्री औरंगाबादेत पोहोचले. तत्काळ त्यांनी उपचार करण्यास सुरुवात केली; मात्र पहाटे पाचच्या सुमारास या वाघिणीचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. दरम्यान, त्या वाघिणीच्या रक्ताचे नमुने पशुवैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविण्यात आले होते. यात वाघिणीच्या यकृत व किडनीवर ताण पडल्याची प्राथमिक माहिती प्राचार्य मार्कंडेय यांनी दिली.
Leave a comment