बीड । वार्ताहर
मागील चार दिवसांपासून वाढत चाललेला कोरोना बाधित व्यक्तींच्या आकड्याला आज मंगळवारी (दि.23) ब्रेक लागला आहे.आज सकाळी जिल्ह्यातून 17 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी अंबाजोगाई येथे पाठवण्यात आले होते. त्या सर्व 17 व्यक्तींचे रिपोर्ट आज निगेटिव्ह आले आहेत. जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने ही माहिती देण्यात आली. दरम्यान परळीतून आज एक रुग्ण आज कोरोनामुक्त होत असून त्यास डिस्चार्ज दिला जाणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी दिली.
Leave a comment