किल्लेधारुर । वार्ताहर
तालुक्यातील शिक्षक व मुख्याध्यापक यांच्या तालुका अंतर्गत बदलीच्या आदेशाची व प्राथमिक पदवीधर शिक्षकाची कागदपत्राच्या सत्यप्रतीची मागणी केली होती. संबधीतास माहिती वेळेत न दिल्याबद्दल राज्याचे माहिती आयुक्त दिलीप धारुरकर यांनी गटशिक्षणाधिकार्यांना पाच हजार रुपयाचा दंड ठोठावला आहे.
तीन वर्षापुर्वी सादेक ईनामदार यांनी गटशिक्षणाधीकारी यांना रितसर अर्ज करुन तालुक्यातील शिक्षक बदली व प्राथमीक पदवीधर शिक्षकांची माहीती मागीतली होती. त्यांना ती देण्यात आली नाही. सोबत अपीलीय अधीकारी यांनी निर्णय देवुन हि उपलब्ध न झाल्याने त्यांनी राज्य माहिती आयोगाकडे धाव घेवुन याप्रकरणी न्याय मागीतला. याप्रकरणी राज्य माहिती आयुक्त दिलीप धारुरकर यांनी अर्जदार सादेक ईनामदार यांचे म्हणणे ग्राह्य धरुन गटशिक्षणाधीकारी यांना पाच हजार रुपये दंड ठोठावला आसुन याबाबत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दंडाची रक्कम संबधीत खात्यात जमा करण्याबाबत अहवाल सादर करावा असे निकालपत्रात म्हटले आहे.
Leave a comment