२६/११ मुंबईतील दहशतवादी हल्ल्यातील दोषी मूळचा पाकिस्तान वंशाचा

तहव्वूर राणा याला अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये अटक करण्यात आली आहे.  

 

 

 

लॉस एंजिल्स : 

२६/११ मुंबईतील दहशतवादी हल्ल्यातील दोषी मूळचा पाकिस्तान वंशाचा तहव्वूर राणा याला अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये  अटक करण्यात आली आहे. भारत सरकारने अमेरिकेला राणा याला अटक करण्याची विनंती केली होती. त्यानंतर त्याला अमेरिकन अधिकाऱ्यांनी अटक केली. लवकरच त्याचे भारतात प्रत्यार्पण केले जाईल, अशी माहिती देण्यात आली.

पाकिस्तानी मूळ असलेल्या आणि सध्या कॅनडाचे नागरिकत्व घेतलेल्या तहव्वूर राणाला भारतात मुंबई हल्ल्याप्रकरणी  दोषी ठरवण्यात आलं आहे. या प्रकरणी २०१३मध्ये त्याला १४ वर्षांची शिक्षा झाली आहे. मुंबईत झालेल्या२६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील प्रमुख  तहव्वूर हुसैन राणा याला अमेरिकेतील लॉस एन्जेलिसमध्ये अटक करण्यात आली आहे. 

 

अमेरिकी वकिलांनी सांगितले, आरोपी तहव्वूर राणा याने शिकागोमध्ये दहशतवादी गटांना पाठिंबा दिल्याप्रकरणी १० वर्षांची शिक्षा भोगली आहे. त्याची ही शिक्षा २०२१ पर्यंत होती. राणा भारतात २०११ मुंबईत हल्ला केल्याप्रकरणातील मुख्य सूत्रधार आहे. या हल्ल्यात जवळपास १६० लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. मुंबई हल्ल्यानंतर त्याला अमेरिकेतील लॉस एंजिल्स येथे पकडण्यात आले होते.

 

५९ वर्षीय राणाला मुंबई हल्ल्याशी संबंधित एका प्रकरणात १४ वर्षांची शिक्षा झाली होती. अमेरिकेतही त्याला दहशतवादी गटांना पाठिंबा दिल्याप्रकरणी १० वर्षांची शिक्षा झाली होती. मात्र, त्याची तब्येत खराब असल्याने मागील आठवड्यात लॉस एंजिल्सच्या तुरुंगातून ठरलेल्या शिक्षेपेक्षा आधीच सोडण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, दोन दिवसांनी त्याला पुन्हा ताब्यात घेण्यात आले.

तहव्वूर राणाला सोडल्यानंतर दोनच दिवसांत अटक करुन पुन्हा ताब्यात घेण्यात आले. आता त्याला भारताच्या ताब्यात देण्यात येणार असल्याची शक्यता आहे. भारताने मुंबई हल्ल्याप्रकरणी याआधीच अमेरिकेकडे प्रत्यर्पणाची मागणी केली होती. याबाबतचे प्रकरण अमेरिकेत अद्याप प्रलंबितच आहे. त्यामुळे अमेरिका राणाला भारताकडे सोपवण्याचा निर्णय घेऊ शकतो. [प्रतिकात्मक छाया]

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.