अजब फतवा; कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यास रुग्णाला सांगू नका, तर...
मुंबई । वार्ताहर
यापुढे कोरोनाचा रिपोर्ट थेट रुग्णांना दिला जाणार नसल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले. असे केल्यास कोणतीही लक्षणे नसलेली व्यक्ती देखील तो रिपोर्ट घेऊन खासगी रुग्णालयात दाखल होते. खासगी रुग्णालयात गरज नसताना त्यांना ऑक्सिजन आणि आयसीयू दिले जाते. त्यामुळे इतर रुग्णांना जागा मिळत नाहीत. खाजगी रुग्णालये लक्षणे नसलेल्या लोकांना दाखल करून घेतात आणि पैसे कमावतात. त्यामुळे रुग्णांच्या हितासाठीच हा निर्णय घेण्यात आल्याचे आरोग्यमंत्री म्हणाले. ज्या रुग्णांना खरंच बेडची गरज आहे त्यासाठी हा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
रेमडेसेवीर आणि टोसीलोझुबामिन या दोन इंजेक्शनची मागणी राज्यभरातून होतेय. याची आग्रहाची मागणी पंतप्रधानांकडे करणार असल्याचे आरोग्यमंत्री म्हणाले. त्याची किंमतही कमी ठेवावी अशी आमची मागणी असल्याचे ते म्हणाले. कोरोनाच्या गंभीर रुग्णांवर उपचार करण्यासाठी ही इंजेक्शन्स फायदेशीर आहेत. तसेच राज्य सरकारचा हेतू स्वच्छ आहे. आम्हाला काहीही लपवायचे नाही असे म्हणत त्यांनी विरोधकांच्या आरोपाला उत्तर दिले. पाचशे व्हेंटीलेटरची मागणीही पंतप्रधनांकडे करण्यात आलीय.
कोरोना चाचणीचे दर आम्ही दोन दिवसांपूर्वी निश्चित केले. त्यानुसार हे दर
२ हजार २०० आणि २ हजार ८०० इतके दर केले आहेत. पण जे थेट लॅबमध्ये जातात त्यासाठी २ हजार ८०० रुपये आकारले जातात. थेट रूग्ण लॅबमध्ये चाचणीसाठी जात असतील तर २ हजार ५०० रुपये घ्यावे असे त्यांनी म्हटले.
मुंबईत रुग्णवाहिका उपलब्ध होत नाही अशी तक्रार आहे. प्रत्येक वॉर्डमध्ये ५ ते १० रुग्णवाहिका आम्ही ठेवत आहोत. तरी १९१६ किंवा वॉर्ड ऑफिसच्या नंबरवर फोन करून रुग्णवाहिकेची मागणी करावी. खाजगी रुग्णवाहिकेची मागणी करू नये असे आवाहन टोपे यांनी केले.
सर्व कोरोनाचे रिपोर्ट एका ठिकाणी येतील, नंतर ते वॉर्ड निहाय पाठवले जातील.
ज्या पॉझिटिव्ह रुग्णात कोरोनाची लक्षणे नाहीत अशा लोकांना खाजगी रुग्णालयांनी दाखल करून घेऊ नये अशा सूचना देण्यात आल्या आहेत. यासाठी महापालिकेचे अधिकारी विशेष लक्ष ठेवणार आहेत.
अजब फतवा; कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यास रुग्णाला सांगू नका, तर...
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना मुंबईतील कोरोना रुग्णांच्या आकडेवारी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात कुरघोडी सुरुच आहेत. राज्यात मुंबईत सर्वाधिक कोरोना रुग्ण आहेत, मुंबईतील कोरोनाबाधितांचे आकडा ५० हजारांच्या वर पोहचला आहे. शहरातील मृतांच्या आकड्यात फेरफार केल्याचा आरोप विरोधी पक्ष भाजपाने महापालिकेवर केला होता.
त्यानंतर आता मुंबई महापालिकेने एक पत्रक काढून चाचणी केंद्रांना मार्गदर्शक सूचना दिली आहे. यामध्ये एखाद्या रुग्णाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असेल तर ते रुग्णाला न कळवता थेट महापालिकेला कळवा असा अजब फतवा काढण्यात आला आहे. यावर मनसेचे माजी आमदार नितीन सरदेसाई यांनी आक्षेप घेतला आहे.
याबाबत नितीन सरदेसाई म्हणाले की, मुंबई महापालिका आयुक्तांचा हा आदेश वाचल्यानंतर मनात काही शंका आल्या आहेत. स्वत:चा रिपोर्ट मिळणे हा रुग्णाचा अधिकार कसा काय हिरावून घेऊ शकता? त्याचसोबत महानगरपालिकेच्या एकूण कामाची पद्धत पाहता त्या पॉझिटिव्ह रुग्णाला उपचार मिळण्यास दिरंगाई झाली आणि त्याच्या जीवितास धोका निर्माण झाला तर जबाबदारी कोणाची? कोरोना रुग्णांची संख्या कमी दाखवण्याचा हा प्रयत्न तर नाही ना अशी शंकाही मनसेने उपस्थित केली आहे.
Leave a comment