नवी दिल्ली  -

 भारत चीन सीमेवर लडाखमधल्या गलवान खोऱ्यात परवा रात्रीपासून सुरू असलेल्या संघर्षात भारताचे 20 जवान शहीद झाले. चीनच्या बाजूचंही या हिंसक वादात नुकसान झालं आहे. जिवाची बाजी लावून चीनची घुसखोरी आणि उद्दामपणा परतवून लावणाऱ्या 20 सैनिकांची यादी लष्कराने जाहीर केली आहे.

या 20 जणांना आलं वीरमरण

1. कर्नल संतोष बाबू, हैदराबाद

2. नौदुराम सोरेन, मयुरभंज

3. सतनाम सिंग, गुरुदासपूर

4. के. पलानी, मदुराई

५. सुनील कुमार, पाटणा

६. बिपुल रॉय, मेरठ

७. दीपक कुमार, रिवा (मध्य प्रदेश)

८. राजेश ओरांग, बिरभूम (प. बंगाल)

९. कुंदनकुमार ओझा, साहिबगंज (उत्तर प्रदेश)

१०. गणेश राम, काकेर (छत्तीसगड)

११. चंद्रकांत प्रधान, कन्नमार (ओडिसा)

१२. अंकुश, हरमिरपूर

१३. गुरविंदर, संगरूर

१४. गुरुतेज सिंग, मानसा

१५. चंदन कुमार, भोजपूर

१६. कुंदन कुमार, सहरसा

१७. अमन कुमार, समस्तीपूर

१८. जयकिशोर सिंग, वैशाली

१९. गणेश हंसदा, सिंहभूम

२०.मनदीप सिंग, पतियाळा

चीनच्या 65 सैनिकांचा खात्मा

भारत जशास तसं उत्तर देण्यास सक्षम : पंतप्रधान नरेंद्र मोदी

भारत-चीन सीमारेषेवर गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षामध्ये चीन सैन्याच्या कमांडिंग ऑफिसरचा मृत्यू झाल्याची माहिती ANI या वृत्तसंस्थेच्या सूत्रांनी दिली आहे. लडाख भागातील पेनगॉंग सो येथे झालेल्या 5 मे पासून वाद सुरू आहेत. सोमवारी झालेल्या हिंसाचारात चीनच्या 65 सैनिकांचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. तर भारताचे 80 जवान जखमी असून 4 जणांची प्रकृती गंभीर आहे.

या परिसरात 1962 साली 33 भारतीय सैनिक शहीद झाले होते. त्यानंतर पुन्हा एकदा गेल्या काही दिवसांपासून सीमावाद धुमसत होता. त्यामधून सोमवारी रात्री धुमश्चक्री झाली. दरम्यान, आंतरराष्ट्रीय मीडियानेही भारत-चीन प्रकरणाला महत्त्व दिल्याचं दिसून आलं. पाकिस्तानच्या डॉनपासून ते गार्डियन, वॉशिंग्टन पोस्ट, सीएनन, न्यूयॉर्क टाइम्स, बीबीसी यांनी कोणत्याही एका देशाची बाजू न घेता या प्रकरणावर भाष्य केलं.

 चिनी सैन्यासोबत गलवान खोऱ्यात झालेल्या धुमश्चक्रीत भारताचे 20 जवान शहीद झाल्यानंतर भारतात संतापाची लाट उठली आहे. चिनी सैन्यांकडून झालेल्या भेकड हल्ल्यात भारताचे अनेक जवान जखमीही झाले. त्यामुळे शहीदांची संख्या वाढण्याची भीतीही आहे. दुसरीकडे या संघर्षात चीनचेही 43 सैनिक मृत किंवा जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे. 

चीनच्या या भ्याड हल्ल्यानंतर राजधानी दिल्लीतील हालचालींना वेग आला आहे. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होत आहे. या बैठकीमध्ये CDS प्रमुख बिपीन रावत, तिन्ही दलाचे प्रमुख उपस्थित आहेत.

 

  • आम्हाला आमच्या जवानांवर अभिमान, जवानांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही, भारत जशास तसं उत्तर देण्यास सक्षम - पंतप्रधान नरेंद्र मोदी

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.