अहमदनगर:

सोशल डिस्टन्सिंगचे नियम तोडून वाढदिवस साजरा केल्याप्रकरणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचेआमदार संग्राम जगताप  यांच्यासह त्यांच्या २५ ते ३० कार्यकर्त्यांवर कोतवाली पोलीस ठाण्यात कलम १८८ आणि २६९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे लॉकडाऊन दरम्यान वाढदिवस साजरा करणं संग्राम जगताप यांना चांगलंच महागात पडलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (१२ जून) संग्राम जगताप यांचा वाढदिवस होता. वाढदिवसानिमित्त अनेक कार्यकर्ते एकत्र जमले होते. याच कार्यक्रमात सोशल डिस्टन्सिंग नियमांचे पालन केले गेले नाही. मास्क न लावता एकत्र येऊन कोरोना आजारासंदर्भात जिल्हाधिकारी यांनी जारी केलेल्या आदेशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी आमदार संग्राम जगतापसह त्यांच्या पंचवीस ते तीस कार्यकर्त्यांविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोरोनासारख्या संसर्गजन्य रोगाच्या विळख्यातून लवकरात लवकर बाहेर पडावं यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. मात्र सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचेच आमदार सर्व नियम धाब्यावर बसून वावरत असतील तर त्यांच्याकडून काय आदर्श घ्यायचा? असा सवाल आता विचारला जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री अजित पवार हे वारंवार सोशल डिस्टन्सिंग ठेवण्याचे आवाहन करत आहेत.

कोरोनाचा सामना करण्यासाठी एकमेव पर्याय म्हणजे सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क घालणं हाच आहे. मात्र, हे सगळे नियम मोडून आमदार जगताप यांचा वाढदिवस त्यांच्या कार्यकर्त्यांनी साजरा केला. दरम्यान, याबाबत कायदेशीर कारवाई केली जाईलच मात्र, पक्षाकडून आमदार संग्राम जगताप यांना कशाप्रकारे समज दिली जाईल हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.

अहमदनगर जिल्ह्यात आतापर्यंत २३५ रुग्ण

अहमदनगर शहरासह जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असून बहुतांश रुग्ण हे मुंबई, पुण्यासह इतर जिल्ह्यातून येत असून त्यांच्या संपर्कात येणाऱ्या अहमदनगर शहर आणि जिल्ह्यातील व्यक्ती देखील कोरोना बाधित होत असल्याची माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वतीने देण्यात आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात आतापर्यंत २३५ रुग्ण सापडले आहेत. तर त्यापैकी ९ जणांचा मृत्यू झाला आहे.

 

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.