विद्युत वहिनीच्या कामाची चौकशीची मागणी
नांदूरघाट । वार्ताहार
केज तालुक्यातील मस्साजोग,राजेगाव,वाघेबाभूळगाव,
वीज सतत जाण्याचे कारण म्हणजे वीज पुरवठा करणार्या विद्यूत वाहीण्या खराब झाल्या आहेत,थोडा वारा पाऊस झाला तरी विद्युत तारा लागलीच तुटत आहेत याचे कारण असे की या विद्युत वाहिन्या दुरुस्त करण्यासाठी जी कामे करण्यात आली ती फक्त कागदोपत्रीच झाली असल्याची शंका आहे कारण दुरुस्तीची कामे झाली असती तर वारंवार लहान वार्या पावसात लगेच विद्युत तारा तुटक्या नसत्या.मागील दोन वर्षांत या भागात विद्युत वाहिन्या दुरुस्त कुठे केल्या त्या मध्ये कोणती कामे केली किती रुपये खर्च केले आदी कामांचा अहवाल आपण विद्युत मंडळाकडे मागावा व झालेल्या कामांची चौकशी करावी अशी मागणी मनसेचे बीड जिल्हा अध्यक्ष सुमंत धस व केज तालुका अध्यक्ष कल्याण केदार यांनी केज तहसीलदार यांच्या कडे केली आहे.
Leave a comment