वाळू चोरी रोखणार्‍या तलाठ्याला वाळू चोराची धमकी

गेवराई । वार्ताहर

तालुक्यातील गोदावरी नदीपात्रात वाळू चोरांचा धुमाकूळ सुरुच आहे. दोन दिवसापूर्वीच चोरटी वाहतूक रोखण्यास गेलेल्या प्रभारी तहसीलदारांच्या कारला टिप्परने धडक दिल्याची घटना ताजी असतानाच आता मौजे खामगाव (ता.गेवराई) येथे आणखी नवा प्रकार समोर आला आहे. वाळू चोरीचे वाहन पकडण्यास गेलेल्या तलाठी व इतर कर्मचार्‍यांना एकाने चक्क ‘मी तहसील समोर येवून आत्महत्या करिन’अशी धमकी दिली. गुरुवारी (दि.11) ही घटना घडली.

सुभाष फुलारे (रा.जायकवाडी वसाहत बागपिंपळगाव) संतोष धनगर (रा.गोपाळ वस्ती बेलगाव) नारायण भुसारी (रा.नागझरी) व ट्रॅक्टर चालक तौफिक यांचा आरोपीत समावेश आहे. या सर्व घटनाक्रमाची व्हिडिओ रेकॉर्डिंग महसूल कर्मचार्‍यांनी केली. झाले असे की, गुरुवारी खामगाव येथे वाळू उपसा सुरु असल्याची माहिती मिळाल्यानंत तलाठी मिसाळ व महसूल कर्मचारी तेथे दाखल झाले. यावेळी वाळू उत्खननासाठी वापरली जाणारी केनी घेवून जात असताना चार जण त्यांना दिसले. महसुल कर्मचार्‍यांनी वाळूचे वाहन ताब्यात घेवून पुढील कार्यवाहीसाठी ते घेवून जात असताना त्यांना दमदाटी केली गेली. यावेळी सुभाष फुलारे याने वाहन नेले तर मी तहसीलसमोर येवून आत्महत्या करिन अशी धमकी देत शासकीय कामकाजात अडथळा आणला. या प्रकरणी खामगाव सज्जाचे तलाठी राहुल मिसाळ यांच्या तक्रारीवरुन चौघांविरुध्द गेवराई ठाण्यात शासकीय कामकाजात अडथळा व वाळूू चोरीचा गुन्हा दाखल झाला. उपनिरीक्षक योगेश टाकसाळ अधिक तपास करत आहेत. 

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.