बीड | वार्ताहर
जिल्हा पोलिस अधीक्षक म्हणून पदभार घेतल्यानंतर अविनाश बारगळ यांनी 10 ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील सर्व अधिकारी आणि पोलीस ठाणेदारांची बैठक घेवून त्यांना सूचना केल्या.जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करण्यासाठी ठाणेदारांना डेडलाईन दिली. तसेच संबंधित ठाणेदारांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही दिला.तडीपार, एमपीडीएच्या कडक कारवाया वाढवून गुन्हेगारी संपुष्टात आणावी, असे आदेशही यावेळी त्यांनी दिले.
बैठकीला अप्पर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर, चेतना तिडके, सहाय्यक पोलिस अधीक्षक कमलेश मिना, डीवायएसपी विश्वांभर गोल्डे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक उस्माण शेख, ठाणेदार शितलकुमार बल्लाळ, शिवाजी बंटेवाड, मारुती खेडकर, उमेश कस्तूरे, वाहतूक शाखेचे सुभाष सानप यांच्यासह इतर अधिकार्यांची उपस्थिती होती.
यावेळी एसपी बारगळ म्हणाले, जनतेच्या सुरक्षेची जबाबदारी पोलिसांवर आहे. त्यांच्याशी चांगलं वागा आणि त्यांची सुरक्षा करा, तक्रारदारांना न्याय मिळेल अशी सकारात्मक भुमिका ठेवा.बदल्या झालेल्या कर्मचार्यांना तात्काळ नव्या बदलीच्या ठिकाणी सोडावे,जर असे झाले नाही तर त्या कर्मचार्यांना नियंत्रण कक्षात नियुक्त केले जाईल, असेही यावेळी बारगळ यांनी म्हटले आहे.
Leave a comment