बीड | वार्ताहर
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते आज शुक्रवारी सायंकाळी पावणे आठ वाजता नगर नाका परिसरातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या बीड शहर मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाभरातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जालना रोडवरील अनविता हॉटेल येथून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ताफा नगर नाका परिसरात पोहोचल्यानंतर कार्यालय परिसरात मनसैनिकांनी ढोल ताशांच्या गजरात तसेच जेसीबीने फुलांची उधळण करत त्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले. राज ठाकरे यांनी कार्यालयाचे उद्घाटन करण्यापूर्वी मनसेच्या वतीने रुग्णसेवेसाठी स्वतंत्र रुग्णवाहिकेचे पूजन करत लोकार्पण केले.
Leave a comment