बीडमधील घटना

 

बीड | वार्ताहर

विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आढावा घेण्यासाठी बीडमध्ये आलेले मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे आज दुपारी जालना रोडवरील अनविता हॉटेलमध्ये येत असताना शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख गणेश वरेकर यांनी घोषणा देत राज ठाकरे यांच्या वाहनावर चक्क सुपार्‍या भिरकावल्या. यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उबाठा गटाच्या कार्यकर्त्यांत धक्काबुक्की झाली या घटनेनंतर बंदोबस्तावरील पोलिसांनी धाव घेत कार्यकर्त्यांना बाजूला हलवले दरम्यान यामुळे बीडमध्ये काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान वरेकर यांना मनसे स्टाईल आम्ही उत्तर दिले असल्याचे मनसेचे नेते शैलेश जाधव यांनी माध्यमांसमोर बोलताना सांगितले आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या मराठवाडा दौऱ्यावर असून विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ते पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आढावा बैठका घेत आहेत. शुक्रवारी दुपारी बीड येथील जालना रोडवरील अन्वित हॉटेलमध्ये त्यांनी कार्यकर्त्यांसमवेत आढावा बैठकीचे आयोजन केले होते. यादरम्यान ते जालना रोड होऊन हॉटेल अन्वित्तामध्ये जाण्यासाठी त्यांच्या वाहनातून येत असताना शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख गणेश वरेकर यांनी अचानक ठाकरे यांच्या वाहनासमोर येऊन सुपार्‍या फेकल्या अचानक झालेल्या या प्रकारामुळे मनसेचे कार्यकर्ते धावून पुढे आले. त्यानंतर वरेकर व मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान माहिती मिळताच बंदोबस्तावरील पोलीस अधिकारी कर्मचारी घटनास्थळी धावून गेले त्यांनी कार्यकर्त्यांना एकमेकांपासून दूर नेले, त्यानंतर जालना रोडवर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला.
दरम्यान या प्रकारानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांचा मिळत आपली आढावा बैठक सुरू केली. जालना रोडवरील अनविता हॉटेल परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

बीडमध्ये जी घटना घडली आहे त्याबाबत पोलीस प्रशासन योग्य ती कायदेशीर कार्यवाही करेल अशी प्रतिक्रिया अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांनी 'लोकप्रश्न'शी बोलताना दिली.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.