मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला डोंगरकिन्हीत साथ ,
राजेंद्र येवले,प्रभाकर येवले यांचा अन्नत्याग ,तर ग्रामस्थांचे साखळी उपोषण
वार्ताहर/डोंगरकिन्ही
मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी आरक्षणात समावेश करावा या मागणीसाठी अंतरवाली सराटीत गेल्या चार दिवसांपासून अमरण उपोषण सुरु असुन त्यांच्या आंदोलनाला साथ देण्यासाठी डोंगरकिन्हीत राजेंद्र येवले आणि प्रभाकर येवले या दोघांचा आज तिसरा दिवस असून अन्नत्याग आंदोलन सुरु केले आहे. डोंगरकिन्हीत साखळी उपोषण २५ आँक्टोबर पासुन सुरु आहे.
डोंगरकिन्हीत राजेंद्र येवले आणि प्रभाकर येवले यांनी पत्रकार परिषदेत घेतली . यावेळी ते म्हणाले की,मनोज जरांगे यांनी सुरुवातीला सुरु केलेल्या आंदोलनाला डोंगरकिन्ही येथे पाठिंबा देऊन तेरा दिवस अन्नत्याग आंदोलन केले होते. आता २५ तारखेपासून आंदोलन सुरु असुन मराठा समाजातील तरुण बांधव आत्महत्या करीत आहेत. शासनाने मराठा समाजाचा फार काळ अंत न पाहता दोन दिवसात निर्णय घेऊन आरक्षण जाहीर करावे. शिर्डी येथील भाषणात मोदी यांनी आरक्षणाचा उल्लेख न केल्याने पठाडे नामक तरुणाने खांबावर गाडी धडकुन आपला जीव गमावला आहे. शासन आजून किती मराठा तरुणांचे बळी घेणार आहेत असा सवाल उपस्थित करीत लवकर आरक्षण जाहीर न केल्यास पुढील काळात पाणी बंद आंदोलन करण्यात येणार आहे. पुढील आंदोलन टोकाचे आणि शांततेचे असेल असेही जाहीर केले.डोंगरकिन्ही परिसरातील गावे दररोज आंदोलन स्थळी येऊन साखळी उपोषण करणार आहेत. तसेच तालुक्यातील ज्यांना अन्नत्याग आंदोलन करायची ईच्छा असेल त्यांनी डोंगरकिन्ही येथील उपोषण स्थळी सहभाग नोंदवावा असे अवाहन केलेआहे.
Leave a comment