आष्टी |प्रतिनिधी
कडा शहरात मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण मिळण्यासाठी आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्याच्या समर्थनार्थ सोमवार दि.३० ऑक्टोबर रोजी सायं.६ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकातुन कॅन्डल मार्च काढत जनजागृती सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली.यावेळी तरुण व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
कडा शहरात सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ महेश मंदिरात साखळी उपोषणास सुरुवात झाली आहे.
यानिमित्ताने शहरात भव्य कॅन्डल मार्च काढत मराठायोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला समाज बांधवांनी पाठींबा दिला.कडा येथील भाजीमंडई येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची आरती करून कॅडल मार्चला सुरुवात करण्यात आली.
त्यानंतर संपुर्ण आचारसंहितेचे पालन करत घोषणाबाजी करत छत्रपती शिवाजी महाराज चौक-मराठगल्ली-छत्रपती संभाजी महाराज चौक-डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक-नगर रोड -महेश मंदिर
या मार्गावर अतिशय शांततेत मेणबत्ती जनजागृती पायी रॅली काढण्यात आली होती.शांततापूर्ण कॅन्डल मार्चनंतर उपस्थित समाज बांधवांनी महेश मंदिरात ह भ प भोसले महाराज यांचे व्याख्यानाचा आस्वाद घेतला. या कार्यक्रमाचे अतिशय शांततापूर्ण सुंदर नियोजन साखळी उपोषणाचे संयोजक व सकल मराठा समाज बांधवांनी केले होते.यावेळी कडा व परिसरातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता.
Leave a comment