बीड |वार्ताहर
बीड शहरातील कालिकानगर भागात शुक्रवारी रात्री 11 च्या सुमारास दोन गट समोरासमोर आले . यावेळी एका गटाकडून गोळीबार करण्यात आला . या गोळीबारात 4 जण जखमी झाले असून उपचारासाठी बीड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे .
दरम्यान हा मामा - भाचे गँगचा वाद असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे . गोपाळ भिसे , मनिराम गायकवाड यांना गोळी लागली आहे . तर मारोती गायकवाड , नारायण गायकवाड या दोघांवर तलवारीचे वार करण्यात आले आहेत . पोलिसांनी आसाराम गायकवाड यास ताब्यात घेतले असून गावठी कट्टा ताब्यात घेण्यात आला आहे .
बीड शहरातील कालिकानगर जवळील बांगर नाला भागात दोन गट समोरासमोर आले . यावेळी गायकवाडच्या गटाने गोळी झाडली असल्याची माहिती आहे . रात्रीच्या वेळी कालिकानगर भागात दोन्ही गटाचे जवळपास शेकडो कार्यकर्ते होते . त्यादरम्यान गोळीबार केला . या घटनेमुळे नागरिकात भीतीचे वातावरण पसरले आहे . दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर , अपर अधीक्षक पांडकर , उपअधीक्षक वाळके आदींनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी रात्री गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती .
Leave a comment