पवार साहेबांनी,केंद्रीय उड्डाण मंत्रालयाशी व तत्सम कार्यालयास फोनवर केली चर्चा
आ.संदीप क्षीरसागरांमुळे हजारो हज यात्रेकरूंचे अतिरिक्त प्रवास भाडे वाचवण्यासाठी प्रयत्नशिल
हज यात्रेकरिता बीड जिल्ह्यातील 450 हज यात्रेकरू व मराठवाड्यातील 3500 यात्रेकरू हजसाठी औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) येथील विमानतळावरून हजसाठी दि.07 जुन 2023 पासून प्रयाण करणार आहेत. औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) येथून जाणार्या एका हज यात्रेकरूसाठी 3,92,738 रूपये एकूण खर्च येत आहे. तसेच मुंबई येथून जाणार्या एका हज यात्रेकरूसाठी 3,04,843 रूपये एकूण खर्च येत आहे. बीडसह मराठवाड्यासाठी हज यात्रेकरूंना मुंबईच्या प्रमाणामध्ये 87,895 रूपये एकूण जास्त प्रवास खर्च येत आहे.
बीडसह मराठवाड्यासाठी हज यात्रेकरूंच्या विनंतीनुसार मुंबईच्या प्रवास भाड्याप्रमाणे औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) येथील भाडे समान असावे किंवा औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) विमानतळ ऐवजी मुंबई विमानतळ स्थळ देणे बाबत संदर्भीय नियमावली बाबत आदरणीय खा.शरद पवार साहेबांसोबत वरील प्रश्नाबाबत व हज यात्रेकरूंच्या विनंतीस मान देवून हजचा अतिरिक्त खर्च संदर्भात सविस्तर माहिती देवून खा.शरदचंद्रजी पवार साहेबांनी केंद्रीय उड्डाण मंत्रालयाशी व तत्सम कार्यालयाशी तातडीने फोनवरून चर्चा केली असून यातील खर्च संदर्भात लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी केली. आ.संदीप क्षीरसागरांच्या तत्पुरतेमुळे बीडसह मराठवाड्यातील हजारो हज यात्रेकरूंचा अतिरिक्त प्रवास भाडे वाचविण्यासाठी प्रयत्नशिल आहेत. यावेळी आ.संदीप क्षीरसागरांसह माजी आ.सय्यद सलीम, डॉ.बाबु जोगदंड आदी उपस्थित होते.
Leave a comment