येळंबघाट पुलावरील घटना;वाहनांची लुट सुरुच

बीड । वार्ताहर

 

केज ते नेकनूर परिसरात धावत्या वाहनांची ताडपत्री फाडून किमती साहित्य चोरुन नेणारी टोळी अनेक दिवसांपासून सक्रीय झालेली आहे. मात्र नेकनूर व केज पोलीस या टोळीला पायबंद घालण्यात अपयशी ठरत असून पोलीसांचा धाक न राहिल्याने चक्क धावत्या टेम्पोची ताडपत्री फाडून चोरट्यांनी टेम्पोतील तब्बल साडेतील लाख रुपयांचे इलेक्ट्रिक बॉक्स चोरुन नेले. 25 नोव्हेंबर रोजी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

 

याबाबत अजमत समद शेख (रा.जुनेगाव गवळी, ता.गंगापूर) यांनी फिर्याद दिली. 25 रोजी पहाटे ते त्यांच्या टेम्पोतून एका कंपनीचे संगणक ऑपरेट करण्याचे इलेक्ट्रिकल्स बॉक्स घेवून नेकनूरमार्गे लातूरकडे जात होते. टेम्पोतील एका इलेक्ट्रिक बॉक्समध्ये 15 पीस होते, त्यातील 3 लाख 43 हजार रुपये किमतीचे 14 पीस चोरट्यांनी हातोहात लंपास केले. हा
नेकनूरनजिक येळंबघाट येथे काम सुरु असलेल्या पुलाजवळ ही घटना घडली. दबा धरुन बसलेल्या चोरांनी टेम्पोवर चढून ताडपत्री फाडली. नंतर आतील इलेक्ट्रिक बॉक्स चोरले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर अजमत शेख यांनी नेकनूर ठाण्यात तक्रार नोंदवली.अज्ञाताविरुध्द चोरीचा गुन्हा नोंद झाला. सहायक फौजदार पवार पुढील तपास करत आहेत.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.