बीड । वार्ताहर
तालुक्यातील चौसाळा येथील अनंतराव चौधरे यांचे नातू डॉ.अभिजीत चंद्रकांत चौधरे यांनी राजीव गांधी आरोग्य विज्ञान विद्यापीठ बेंगलुरू (कर्नाटक) विद्यापीठाच्यावतीने घेण्यात आलेल्या एम.डी. (मेडीसीन) परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
डॉ. अभिजीत चौधरे हे चौसाळा येथील मुळ रहिवासी असून त्यांचे प्राथमिक शिक्षण चौसाळा येथील जिल्हा परिषद शाळेत झाले आहे. त्यांचे उच्च माध्यमिक शिक्षण दयानंद विज्ञान महाविद्यालय लातूर येथे तर एब.बी.बी.एस.चे शिक्षण डॉ.विखे पाटील वैद्यकीय महाविद्यालय अहमदनगर येथे पूर्ण झाले आहे. त्यांनी राजीव गांधी आरोग्य विज्ञान विद्यापीठातून एम.डी. (मेडीसीन)चे पदव्युत्तर शिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल त्यांचे माजी मंत्री जयदत्तआण्णा क्षीरसागर, गणेशआण्णा झगडे, नारायणराव गोरे, प्रा.प्रशांत झरेकर, आरोग्य उपसंचालक डॉ.हेमंत बोरसे, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. सुर्यकांत साबळे, डॉ. राठोड, डॉ. महादेव चिंचोले, डॉ.विजय इंगळे, डॉ.भोपळे, डॉ. राऊत, डॉ.रविकांत चौधरे, डॉ. राजश्री चौधरे यांच्यासह डॉक्टर असोसिएशन बीड तसेच समाजातील सर्व स्तरातून अभिनंदन केले.
Leave a comment