बीड | वार्ताहर

 

बीड नगर पालिकेतील अनागोंदी कारभारामुळे बीडकरांना विविध समस्यांचा सामना करावा लागला होता. अनेकवेळा या संदर्भात आवाज उठवूनसुद्धा बीड नगर पालिकेच्या कामकाजात सुधारणा होत नव्हती. यामुळे आमदार विनायक मेटे यांनी बीड नगर पालिकेत सुरु असलेल्या अनागोंदी कारभार अधिवेशनात लक्षवेधीच्या माध्यमातुन समोर आणला होता. याची दखल घेऊन आज सोमवारी (दि.21) बीड नगर पालिकेचे पाणी पुरवठा अधिकारी राहुल टाळके,कर अधीक्षक सुधीर जाधव, कनिष्ठ रचना सहाय्यक सलिम सय्यद याकूब व बांधकाम अभियंता योगेश हांडे या चार जणांच्या निलबंनाची घोषणा अधिवेशनात राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केली. तसेच नगर पालिकेचे मुख्याधिकारी डॉ.उत्कर्ष गुट्टे आणि नगर प्रशासन अधिकारी निता अंधारे यांची येत्या दोन दिवसात चौकशी करून पुढील निर्णय घेतला जाईल असेही राज्यमंत्री तनपुरे यांनी सभागृहात सांगितले.  

 

बीड नगरपालिका हद्दतील नागरिकांना पिण्याचे पाणी 15-15 दिवसांनी मिळणे, माजलगाव  बॅकवॉटर व बिंधुसरा धरणांमधून बीड शहरा करीता येणारे गढूळ, आणि पिण्यायोग्य नसणे फिल्टर प्लांटची अत्यंत वाईट अवस्था झालेली असणे. ब्लिचिंग पावडर पूर्ण विरघळत नसणे, शुध्दीकरण व्यवस्थीत न केल्यामुळे नागरीकांच्या आरोग्याशी नगरपालिकेने प्रयत्न करणे, त्या बाबत कोणतीही काळजी न घेणे याचबरोबर बीड नगरपालिका हद्दीमध्ये अनेक वसाहती मध्ये वीज नसणे वेळेवर वीज न मिळणे बेकायदेशीर अनेक ठिकाणी कनेक्शन निदर्शनास येणे, रस्त्यावरच्या वीज महिनो महिने बंद असणे त्यामुळे मोठ्या प्रमाणात चोर्‍यांचे प्रमाण व अवैध धंद्याचे, गुन्हेगारीचे प्रमाण वाढलेले असणे, याबाबत नगरपालिकेने व महावितरण कंपनीने पूर्ण दुर्लक्ष करणे बीड नगरपालिकेने कोरोना काळातील मयताच्या अंत्यविधीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करणे, मयतांच्या टाळूवरील लोणी खाण्याचा प्रकार करणे, त्यामध्ये अधिकारी-पदाधिकारी सामील असणे नगररचना कार व ट्रेसर्स यांनी अवैध बांधकामास भ्रष्टाचार करून अभय देणे पैसे घेतल्या शिवाय कोणतीही बांधकाम परवान्याचे काम न करणे यासह इतर महत्वांचे प्रश्न आमदार विनायक मेटे यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून अधिवेशनात मांडले होते. याचीच दखल घेऊन आज सोमवारी (दि.21) बीड नगर पालिकेतील चार अधिकार्‍यांचे निलंबन करण्यात आले आहे. तर नगर पालिकेचे मुख्याधिकारी डॉ.उत्कर्ष गुट्टे आणि नगर प्रशासन अधिकारी निता अंधारे यांची येत्या दोन दिवसात चौकशी करून पुढील निर्णय घेतला जाईल असेही राज्यमंत्री तनपुरे यांनी सभागृहात सांगितले.  

निलंबन झालेल्यामध्ये यांचा समावेश

आ.विनायक मेटे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशना दरम्यान विधान परिषदेत केलेल्या लक्षवेधीनंतर आज सोमवारी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी बीड न.प.चे पाणी पुरवठा अधिकारी राहुल टाळके,कर अधीक्षक सुधीर जाधव, कनिष्ठ रचना सहाय्यक सलिम सय्यद याकूब, बांधकाम अभियंता योगेश हांडे या चार जणांच्या निलबंनाची घोषणा केली आहे.  

 

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.