केज | वार्ताहर
कोवीड काळात सर्व नागरिकांना जिवदान देण्यासाठी ज्यांनी अहोरात्र परिश्रम घेतले. अशा व्यक्तींचा नुकताच सन्मान सोहळा संपन्न झाला आहे त्यामध्ये लोखंडी सावरगाव येथील वैद्यकीय अधिक्षक डॉ. अरूणा केंद्रे (दहीफळे) यांचा विशेषगुण गौरव करून त्यांना कोवीड योद्धा म्हणून
मा. जिल्हा अधिकारी व राजकीय ,प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले आहे.
गेल्या दोन वर्षापासून संपूर्ण जगभरात कोविड..१९ या आजाराने धुमाकूळ घालत जनजीवन विस्कळीत केले आहे. अनेक जिव गेले आहेत, कित्येक कुटुंब या संकटामुळे उध्वस्त झाले आहेत. सामाजिक, राजकीय संघटना वैद्यकीयक्षेत्रातील कर्तबगार अधिकारी यांनी नागरिकांना आधार देऊन या संकटातून बाहेर काढण्यासाठी खूप मोठे योगदान दिले आहे. वैद्यकीय प्रशासकीय अधिकारी म्हणून केज, लोखंडी सावरगाव रूग्णालयात सेवा करताना डॉ. अरूणा केंद्रे यांनी कोविड काळात रूग्ण सेवे बरोबरच त्यांना मानसिक आधार देऊन. कोरोना रुग्ण बरे करण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेतले आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन मा. जि.अधिकारी राधाबिनोद शर्मा, पालक मंत्री धनंजय मुंडे, आमदार संदीप क्षिरसागर यांच्या उपस्थित त्यांना कोवीड योद्धा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
डॉ. अरूणा केंद्रे यांच्या वैद्यकीय सेवेचा आलेख वाढत असल्याने त्यांचे सर्व स्तरातून कौतुक केलं जातं आहे. केज येथील आदर्श पत्रकार समितीच्या वतीने त्यांना आदर्श वैद्यकीय सेवा पुरस्कार प्रदान केलेला आहे. तसेच मुकनायक दिनानिमित्त पुरोगामी पत्रकार संघाच्या वतीनेही त्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.
Leave a comment