अंबाजोगाई | वार्ताहर
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या एकूण ९३ विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करुन शिक्षण क्षेत्रात दबदबा निर्माण केला आहे.
भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाई संचलित एकुण १८ संस्कार केंद्राच्या वतीने प्रतिवर्षी प्रमाणे (२०२०-२१)याही वर्षी इ.५वी वर्गातील एकुण ४७ विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत तर इ.८वी वर्गातील एकुण ४६ विद्यार्थी पात्र ठरले आहेत असे संस्थेच्या एकूण ९३ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे.
त्यात केशवराज विद्यालय लातूर ३८, सिध्देश्वर विद्यालय माजलगाव १४,लाल बहादूर शास्त्री विद्यालय उदगीर१३, विवेकानंद प्राथमिक विद्यालय सेलू ०७,खोलेश्वर माध्यमिक विद्यालय अंबाजोगाई ०७,आर्य चाणक्य प्राथमिक विद्यालय पैठण ०५,संचारेश्वर प्राथमिक विद्यालय जिंतूर ०४, गोळवलकर गुरुजी माध्यमिक विद्यालय देगलूर ०१, नाना पालकर प्राथमिक विद्यालय नांदेड ०२, दत्ताजी भाले माध्यमिक विद्यालय अंबड ०१,स्वा.सावरकर प्राथमिक विद्यालय बीड ०१, अशा संस्थेतील एकूण ९३ विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या परीक्षेत यशाची उत्तुंग भरारी घेतली आहे.यशस्वी विद्यार्थ्यांचे भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष डॉ.सुरेंद्रजी अलुरकर, उपाध्यक्ष राधेश्याम जी लोहिया, कार्यवाह नितीनजी शेटे, विद्यासभेचे अध्यक्ष किरणराव भावठाणकर, कोषाध्यक्ष विकासराव दुबे,सहकार्यवाह प्रा.चंद्रकांतराव मुळे, डॉ.कल्पनाताई चौसाळकर, डॉ.हेमंत वैद्य,शिक्षक प्रतिनिधी अप्पाराव यादव,सह सर्व पदाधिकारी ,सर्व स्थानिक समन्वय समितीचे पदाधिकारी, शालेय समितीचे सदस्य, संस्कार केंद्र प्रमुख,व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.
Leave a comment