बीड | वार्ताहर
वाढती लोकसंख्या आणि गरज लक्षात घेता बीड येथे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय असणे गरजेचे आहे देशात प्रत्येक जिल्ह्यात एक वैद्यकीय महाविद्यालय या धोरणानुसार बीडमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करावे अशी मागणी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी आज वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्याकडे केली आहे
देशामध्ये प्रत्येक जिल्ह्यात एक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय या शासकीय धोरणानुसार मराठवाड्यातील बीड या जिल्ह्याच्या ठिकाणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय होणे आवश्यक आहे सध्या बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे असलेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय म्हणून मंजूर करण्यात आलेले आहे वाढती लोकसंख्या आणि गरज लक्षात घेता बीड शहरात नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची नितांत गरज आहे यामुळे शासकीय रुग्णालयाचा ताण कमी होईल आणि जनतेला आरोग्याच्या सेवा सुरळीत मिळतील तसेच मोठमोठ्या आजारांच्या उपचारासाठी बाहेर गावी जाण्याची गरज राहणार नाही नवीन वैद्यकीय महाविद्यालय झाल्यावर याठिकाणी दुर्धर आजाराच्या उपचारांची सोय होईल बीड शहरात जवळपास सर्वच मुख्यालय आहेत त्यामुळे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय देखील होणे गरजेचे असून नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला मंजुरी द्यावी अशी मागणी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांची भेट घेऊन केली आहे यावेळी रोहित क्षीरसागर, नगरसेवक मुखींद लाला,मुख्याधिकारी डॉ उत्कर्ष गुट्टे हेही उपस्थित होते
Leave a comment