भगरीचे खुले पीठ बाजारातून विकत घेऊ नका
बीड | वार्ताहर
नवरात्रीच्या निमित्ताने नागरिक ब-याच प्रमाणात उपवासाचे पदार्थ खरेदी करत असतात. अशावेळी नागरिकांनी भगर,शाबुदाना खाद्यतेल विकत घेतांना ते पॅकबंद असल्याची खात्री करावी.भगर,शाबुदाना खद्यतेल विकत घेतांना त्या अन्नपदार्थावर लेबल व उत्पादकाचे नाव नसल्यास असे पदार्थ खरेदी करु नये. तसेच ग्राहकांच्या आरोग्याला धोकादायक ठरणारे पदार्थ विकणाऱ्या व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जातील असा इशारा सहाय्यक आयुक्त (अन्न) अन्न व औषध प्रशासन बीड यांनी दिला आहे.
कोणत्याही अन्न व्यवसायिकांनी FSSi FOA चा अन्न नोंदणी,परवाना शिवाय अन्न व्यवसाय करु नये. कोणत्याही अन्न पदार्थावर अन्न परवाना, अन्न नोंदणी क्रमांक नसल्यास अन्नपदार्थ खरेदी करु नये खुली भगर किंवा बिना लेबल असलेले भगरीचे पीठ विकण्यात येऊ नये. बॅन्डेड चांगल्या प्रतीची भगर विक्री करावी. मुदतबाह्य झालेले अन्न पदार्थ विक्री करु नये. अन्न व्यवसायिकांनी भगर उत्पादनाच्या नोंदणी,परवाना शिवाय पीठ स्वत: तयार करुन विक्री करु नये. खराब प्रतीची भगर ग्राहकांच्या आरोग्याला धोकादायक ठरु शकते त्यामुळे खराब प्रतीची भगर व इतर खराब प्रतीचे अन्न पदार्थ खरेदी किंवा विक्री करु नये अन्यथा अन्न व्यवसायिकावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. असा इशाराही अन्न व औषध प्रशासनाने दिला आहे दरम्यान नागरिकांनी नवरात्र उत्सवाच्या कालावधीत भगरीचे खुले पीठ बाजारातुन विकत घेऊ नये.तसेच
खरेदी करत असलेल्या वस्तु याचे उत्पादन दिनांक व बेस्ट बिफोर कालबाह्याचा दिनांक तपासून घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
Leave a comment