शंतनु शिंदे , स्वानंद देशमुख यांचे जगातील ६६ विद्यार्थ्यात स्थान
बीड | वार्ताहर
युनायटेड स्टेस्ट्स आणि ओरीयन अबँकस असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या जागतिक गणित स्पर्धेत बीड येथील गुरुकुल इंग्लीश स्कूलच्या शंतनू वैभव शिंदे आणि स्वानंद संजय देशमुख यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर घवघवीत यश संपादन केले असुन. त्यांनी जगातील यशस्वी ६६ विद्यार्थ्यामध्ये येण्याचा मान पटकावत 30 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या अंतिम स्पर्धेत धडक मारली आहे.
नुकत्याच झालेल्या या स्पर्धेत सदस्य असलेल्या गुरुकुल इंग्लीश स्कूलच्या अबँकस विभागाने चमकदार कामगिरी केली आहे. रोबोट बरोबर ऑनलाईन पाच स्तरावर घेण्यात आलेल्या परीक्षा निवड स्पर्धेत या दोन्ही विद्यार्थ्यानी स्पर्धेतील आपले स्थान कायम राखले आहे. हे स्थान मिळवण्यासाठी पंधरा गोल्ड क्राऊन मिळवणे आवश्यक असते. ज्यामध्ये जगातील ईतर देशातील एकूण १३४३ विद्यार्थ्याची परीक्षा सप्टेंबर महिन्यात घेण्यात आली होती. पैकी पात्र ठरलेल्या ६६ विद्यार्थ्याच्या यादीत गुरुकुल च्या शंतनू शिंदे व स्वानंद देशमुख यांनी स्थान प्राप्त केले आहे. प्रथम क्रमांकास पाचशे यूएसऐ डॉलर आणि द्वितीय क्रमांकास दोनशे यूएसऐ डॉलर असे बक्षीस आहे. यशस्वी विद्यार्थ्याचे संस्थेचे सचिव डॉ. राजेंद्र ढाकणे, अध्यक्षा डॉ. सौ. विनिता ढाकणे, कार्यकारी संचालक अखिलेश ढाकणे, अबँकस विभाग प्रमुख अशोक घोडके, बी. एस तकीक, मनोज सर्वज्ञ, व सर्व शिक्षक वृंदानी पुष्पगुच्छ देवून पालकांसमवेत स्वागत केले आहे.
Leave a comment