18 गेट चार फूट उंचीने उघडले
गेवराई | वार्ताहर
जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये शुक्रवारी रात्री दमदार पाऊस झाल्याने आज शनिवारी सकाळी सात वाजता धरणात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणावर सुरू झाली. त्यामुळे पाटबंधारे विभागाने गेट क्र. 10 ते 27 असे एकुण 18 गेट 3 फुट उंचीवरुन 4 फुट उंचीवर उघडण्यात आले. अशाप्रकारे सद्यस्थितीत गोदावरी नदीपात्र एकुण 89604 क्यूसेक पाण्याचा विसर्ग वाढवला आहे. शुक्रवारी मध्यरात्री पैठण तालुक्यासह जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. शनिवारी सकाळी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव व शाखा अभियंता विजय काकडे यांनी आपात्कालीन 1 ते 9 क्रमांकाचे दरवाजे विसर्ग करण्यासाठी उघडण्याचा निर्णय घेतला. 89 हजार 604 क्यूसेक पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीत सोडला आहे.
जायकवाडी धरणाचे सर्वच 27 दरवाजे उघडण्यात आले आहेत. दरवाजा क्रमांक 10 ते 27 हे दरवाजे 4 फूट उघडण्यात आले आहे. आपत्कालीन 9 दरवाजे क्रमांक 1 ते 9. 1.5 फूट उघडण्यात आले आहेत. या पाण्याच्या विसर्गामुळे गोदावरी नदी आता दुथडी भरून पुन्हा वाहत आहे. सध्या या धरणामध्ये 89 हजार 232 क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे. धरणाची 99.62 टक्केवारी झाली एकूण जिवंत पाणीसाठा 2162. 577 दलघमी आहे. पाण्याची आवक कमी-जास्त पद्धतीने सुरू आहे. जायकवाडी धरणामधून आज सकाळी 7 वाजता गेट क्र.1 ते 9 असे एकुण 9 गेटस 0 फुटावरुन 1.5 फूट उंचीवर उघडण्यात येणार आहेत. अशाप्रकारे 14148 क्यूसेक विसर्ग गोदावरी नदी पात्रात वाढवून 89604 क्युसेक विसर्ग सुरू ठेवण्यात येणार आहे. 1 ते 9 असे एकुण 9 आपात्कालीन गेट हे 1.5 फूट उंचीने उघडण्यात आले आहेत तर 10 ते 27 असे एकुण 18 गेट 4 फूट उंचीने उघडण्यात आले आहेत.
Leave a comment