सप्ताहाच्या पहिल्या दिवशी १५० ज्येष्ठ नागरिकांना दिल्या विविध आरोग्य सुविधा
केक कापत गुलाबाचे पुष्प देऊन डॉ.साबळेंनी केला ज्येष्ठांचा सन्मान
बीड | वार्ताहर
जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या आरोग्यवर्धिनी सप्ताहास १ ऑक्टोबर २०२१ रोजी वृध्दत्व व मानसिक आरोग्य केंद्र लोखंडी सावरगांव (ता.अंबाजोगाई) येथे सुरुवात झाली. आरोग्य मंडळ लातुरचे
उपसंचालक डॉ. एकनाथ माले यांच्या प्रमुख उपस्थितीत आरोग्यवर्धिनी सप्ताहाचे आज उदघाटन करण्यात आले. सप्ताहाच्या पहिल्या दिवशी १५० ज्येष्ठ नागरिकांना विविध आरोग्य सेवा देण्यात आल्या. याप्रसंगी असंसर्गजन्य रोग तपासणी, मधुमेह व उच्च रक्तदाब तपासणी, कान नाक घसा तपासणी, डोळयांची तपासणी, गुडघ्यांचे तपासणी इत्यादी उपचार करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुरेश साबळे यांनी जागतिक ज्येष्ठ दिनानिमित्त केक कापुन ज्येष्ठ नागरिकांमध्ये चैतन्य व उत्साह निर्माण केला व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गुलाबाचे फुल देवुन त्यांचे स्वागत केले.
कार्यक्रमाच्या उदघाटनप्रसंगी भजनी मंडळाने सुश्राव्य असे भजन सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. याप्रसंगी डॉ. सुरेश साबळे यांनी प्रास्ताविक कसन कार्यक्रमाची रूपरेषा दिली. ज्येष्ठांचे आरोग्य हा फक्त एक दिवसाचा किंवा एक सप्ताहाचा विषय नसुन या रुग्णालयात वर्षभर वृध्दीसाठी आरोग्य सेवा उपलब्ध राहिल अशा सुचना त्यांनी दिल्या. वृध्दत्व व मानसिक आरोग्य केंद्र अंबाजोगाई है विस्तीर्ण जागेत उभा केलेले वृध्दांसाठी आकर्षक व एकमेव असे आरोग्य केंद्र असुन ज्येष्ठ नागरिकांनी याचा लाभ असे आवाहन त्यांनी केले.
असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत राबविण्यात येणाऱ्या आरोग्यवर्धिनी सप्ताहात ७ दिवस ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध आरोग्य सेवा देण्याचे नियोजन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे व त्यांच्या टिमने केले आहे. आरोग्यवर्धिनी सप्ताह उपसंचालक डॉ.एकनाथ माले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडत असुन यात विशेषज्ञ डॉक्टरांची उपस्थिती राहणार आहे. आरोग्यवर्धिनी सप्ताहाचे आयोजन वैद्यकिय अधिक्षक डॉ.चंद्रकांत चव्हाण व डॉ.अरुणा केंद्रे यांनी केले असुन डॉ दिलीप गायकवाड, डॉ.बासंती चव्हाण, स्वारातीचे डॉ. अनिल परदेशी, डॉ.सृष्टी, डॉ. गालफाडे यांचा शिबीरामध्ये सहभाग होता. मराठवाडा ज्येष्ठ नागरिक संघाचे प्रकाश वळसे , श्रीमती कासारेताई, श्रीमती गरडताई, निवृत्त आर्मी कमांडर श्गिरवलकर यावेळी उपस्थित होते.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.रौफ शेख यांनी यावेळी उपस्थित राहुन ग्रामीण आरोग्य यंत्रणेला ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्य उंचाविण्याच्या सूचना दिल्या .
Leave a comment