आष्टी । वार्ताहर

करोनामुळे बदललेल्या दैनंदिन सवयींचे पडसाद प्लास्टिक कचऱ्यावरही उमटले आहेत. प्लास्टिक बंदीच्या नियमाला सोयीस्कररीत्या बगल देऊन दुकानदार आणि नागरिकांनीही प्लास्टिकच्या पिशव्यांचा सर्रास वापर सुरू केल्याचे दिसून येत आहे. शहरात दररोज जमा होणाऱ्या कोरड्या कचऱ्या प्लास्टिक पिशव्यांच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली आहे. यात खाद्यपदार्थांच्या पिशव्यांसह हँड बॅगचेही प्रमाण अधिक आहे.

प्लास्टिक पिशव्यांमुळे होणारे पर्यावरणाचे नुकसान टाळण्यासाठी शासनाच्या प्लास्टिक बंदीच्या कायद्याचे आष्टी शहरांमधील व्यापारी सर्रास उल्लंघन करत असल्याचे नगरपंचायत च्या लक्षात आल्यानंतर आज त्यांनी नगरपंचायत च्या प्लास्टिक बंदी अधिनियम कायद्याअंतर्गत आष्टी शहरातील प्लास्टिक वापर करणार्‍या व्यापार्‍यांवर धडक कारवाई करत प्लास्टिक जप्त केले. 

मुख्य कार्यकारी अधिकारी नीता अंधारे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपंचायतचे अभियंता एन एम गीते यांनी व नगरपंचायतीच्या कर्मचार्‍यांनी  शहरांमध्ये सकाळी प्रत्येक दुकानांमध्ये जाऊन तपासणी करून प्लास्टिक वापर करणार्‍या दुकानदारांवर कारवाई केली. आज शहरांमध्ये 10 दुकानांमध्ये कारवाई करण्यात आली यामध्ये जवळपास पंधरा किलो प्लास्टिकच्या बॅग जप्त करण्यात आल्या. गीते यांच्या शी आमच्या प्रतिनिधीने संपर्क साधला असता ते म्हणाले की प्लास्टिक बंदीचा उल्लंघन करणार्‍या वर यापुढे दंडात्मक कारवाई केली जाईल. आज रोजी केवळ त्यांना एक्टिवमेशन म्हणून आम्ही केवळ प्लास्टिक जप्त केले आहे .तरी दुकानदारांनी प्लास्टिक वापर करू नये शासनाच्या कायद्याचे उल्लंघन करू नये असेही ते म्हणाले.



 

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.